7th Pay Commission : लेबर ब्युरोने AICPI निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे असून महागाई भत्ता या आधारे ठरवण्यात येतो.आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत.सदरील आकडे 31 जुलैला येणार होते, मात्र तो लांबणीवर पडले आहे.
7th Pay Commission DA Hike
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत चांगली बातमी आली आहे. जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जून 2024 साठी AICPI इंडेक्स क्रमांक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु त्यांचा महागाई भत्ता किती वाढेल याची पुष्टी झाली आहे.
आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा ३ % वाढ होऊ शकते.दोन वर्षांत पहिल्यांदाच 3 % वाढ होणार आहे.मागील चार वेळा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
लेबर ब्युरोने महागाई भत्ता ठरवणाऱ्या AICPI निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत. 31 जुलैला येणार अहवाल लांबणीवर पडला आहे.मात्र, सध्याचा ट्रेंड पाहिल्यास महागाई भत्त्यात केवळ 3 % वाढ दिसून येईल.सध्या महागाई भत्ता 53 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.
AICPI निर्देशांक काय आहे?
महागाई भत्ता किती वाढू शकतो हे AICPI निर्देशांकातील आकडे ठरवतात.जानेवारी ते जून 2024 दरम्यान मिळालेल्या आकड्यांच्या आधारे जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवले जाईल.
आतापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे आकडे आले आहेत. आत्तापर्यंत 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता मिळत आहे.
आता नवीन महागाई भत्ता जुलैपासून लागू होणार आहे. जानेवारीमध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला. यानंतर, फेब्रुवारीमध्ये निर्देशांक 139.2 अंकांवर, मार्चमध्ये 138.9 अंकांवर, एप्रिलमध्ये 139.4 अंकांवर आणि मेमध्ये 139.9 अंकांवर राहिला. या धर्तीवर एप्रिलमध्ये महागाई भत्ता 51.44 टक्के, 51.95 टक्के, 52.43 टक्के आणि मे महिन्यात 52.91 टक्के झाला आहे.
थोडक्यात महागाई भत्त्यात केवळ ३ टक्क्यांनी वाढ होणार आहे.तज्ज्ञांच्या मते, महागाई भत्त्यात केवळ 3 % सुधारणा दिसून येते.निर्देशांकानुसार, मे पर्यंत महागाई भत्ता 52.91% आहे. जूनचा आकडा अजून यायचा आहे. जूनमध्ये निर्देशांक 0.7 अंकांनीही वाढला तर तो 53.29 टक्क्यांवर पोहोचेल.
DA 4% वाढसाठी,निर्देशांक 143 अंकांपर्यंत पोहोचावा लागेल,सध्या ते अशक्य दिसते आहे.निर्देशांकात इतकी मोठी वाढ होणार नाही. त्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांना केवळ 3 टक्क्यांवर समाधान मानावे लागणार आहे.
महागाई भत्ता कधी जाहीर होणार?
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) पुढील सुधारणा 1 जुलैपासूनच लागू होणार असली तरीही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत त्याची घोषणा होऊ शकते.
कामगार ब्युरो आपला डेटा वित्त मंत्रालयाकडे सादर करेल आणि वित्त मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली जाईल.
साधारणपणे, जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहीर केला जातो. सप्टेंबरमध्ये घोषणा झाल्यास, कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टची थकबाकी मिळेल आणि त्याच महिन्याच्या पगारात दिला जाईल.
महागाई भत्ता शून्य होणार ?
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजेच (0) होणार नाही.महागाई भत्त्याची गणना सुरू राहील. याबाबत कोणताही निश्चित नियम नाही.शेवटच्या वेळी हे केले गेले होते जेव्हा आधार वर्ष बदलले होते.आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही आणि तशी शिफारसही नाही.परिणामी केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना केवळ 50 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.