Property documents : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे . सातबारा 8 A भू नकाशा प्रॉपर्टी कार्ड यासारखे कागदपत्रे ही मालमत्तेविषयी कामगिरी वाजवताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारची कागदपत्रे प्रॉपर्टी डॉक्युमेंट म्हणून ओळखली जातात. तर प्रत्येक डॉक्युमेंटचे काय महत्त्व आहे. याविषयी आपण ह्या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.
मालमत्ते संबंधित आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
7/12: सातबारा हा मालमत्तेविषयी महत्त्वाचा पेपर म्हणून ओळखला जातो. जमीन कोणाच्या मालकीचे आहे. किती मोठी आहे. व तिचे जमीन असल्यास काय पिकवले जाते. हे सांगणारी जमिनीच्या माहिती सातबारा द्वारे आपल्याला माहिती होते.
8 A: या कागदपत्राद्वारे मालमत्ते मालमत्तेच्या खात्याच्या रेकॉर्डची सर्व माहिती व जमीन मालकाचे तपशील आणि सर्व माहिती 8 अ या कागदपत्रांमध्ये दर्शवली जाते.
फेरफार: फेरफार हे कागदपत्र सातबाराच्या अर्कातील सर्व तपशील अपडेट करत असतो व दुरुस्त करतो सातबारा संदर्भात काही चुका दुरुस्त करणे किंवा जमिनीच्या डायरीमध्ये नवीन जोडणे यासारखे काम फेरफार द्वारे केले जाते.
शोध अहवाल / EC: आपण ज्या वेळेस जमीन खरेदी करत असतो त्यापूर्वी लोकांना हा अहवाल मिळतो शोध अहवाल हे एखाद्या गुप्तहेरच्या चिठ्ठी सारखे राहते ज्यामध्ये गेल्या 30 वर्षाच्या जमिनीचा सर्व इतिहास त्यामध्ये समाविष्ट केलेला राहतो.
इंडेक्स 2 :हा एक कायदेशीर प्रकारचा दस्तावेज असून ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्राची नोंदणीकृत मालमत्तेच्या व्यवहाराचा तपशील दिलेला राहतो याद्वारे तुम्हाला सर्व मालमत्ते विषयी सर्व माहिती प्राप्त होते.
भुनकाशा: भू नकाशा तुम्हाला त्या मालमत्तेविषयी अचूक भौगोलिक स्थान व सीमा ओळखण्याकरिता मदत करते व जमिनीच्या सीमेवरील वादांचे निराकरण करण्याकरिता आणि जमिनीची विक्री किंवा खरेदी करताना अचूक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंमलबजावणी भू नकशाद्वारे केली जाते
प्रॉपर्टी कार्ड: तुम्हाला शहरांमधील इमारतीसाठी ओळखपत्र म्हणून प्रॉपर्टी कार्ड याचा उपयोग होतो शहरी भागामध्ये इमारत व जमिनीचा तुकडा कोणाच्या मालकीचा आहे हे प्रॉपर्टी कार्डद्वारे तुम्हाला माहीत होते.
मार्गदर्शक मूल्य: तुम्ही ज्या वेळेस जमीन खरेदी करत असता त्यापूर्वी तुम्हाला त्याची सरासरी किंमत म्हणजेच मूल्यमापन हे खरेदीपूर्वी किंमत टॅग तपासण्यासारखे आहे.
सूचना : ही कागदपत्रे तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत असतात यामुळे तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.