Mutual Fund Tax : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गेल्या काही वर्षांमध्ये म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. जसजशी म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढत आहे तस तशी म्युचल फंडावरील आयकर आकारणी नियमांमध्ये बदल झालेले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्युच्युअल फंडाच्या आयकर संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे अल्पकालीन भांडवल नफा व दीर्घकालीन भांडवल नफा ठरवण्याचे दोन प्रवाह किंवा होल्डिंग कालावधीनुसार म्युच्युअल फंडाची टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे.
Mutual Fund Investment Tax Calculator
मित्रांनो सर्वसामान्य अर्थसंकल्पातून भांडवली मालमत्तेवरील भांडवली नफा कर आणि दीर्घकालीन भांडवली वरील नफा वाढवला गेला आहे.
मोदी सरकारच्या या पावलामुळे आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांवर थेट परिणाम होणार असून याविषयी सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत.
म्युच्युअल फंड होल्डिंगचे दोन प्रकार
मित्रांनो म्युच्युअल फंडाच्या विचार करायचा झाल्यास अल्पमुदत आणि दीर्घकालीन भांडवल नफा असे दोन प्रकार किंवा होल्डिंग ठरवण्यात आलेले आहे अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये बारा महिन्याच्या कालावधी आणि दीर्घकालीन मुदतीमध्ये 24 महिन्याचा कालावधी ठरलेला आहे.
एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या सर्व सूचीबद्ध मालमत्ता, म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड, दीर्घकालीन म्हणून वर्गीकृत केल्या जाणार असून दोन वर्षे पेक्षा अधिक काळ ठेवलेल्या मालमत्ता किंवा होल्डिंग्स या दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये मोडल्या जाणार आहे सदरील नियमावली 23 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे.
म्युच्युअल फंड होल्डिंगवर किती टॅक्स लागणार
दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या सर्व प्रकारावर आता एकसमान (LTCG) 12.5% कर आकारला जाणार आहे. बजेट मधून गुंतवणूकदारांना मिळणारा इंडक्शन चा फायदा आता काढून टाकण्यात आला आहे.यापूर्वी काही मालमत्त्यावर इंडेक्शनसह 20 टक्के व इंडेक्शनशिवाय दहा टक्के कर आकारण्यात येत होता.आता इंडेक्सेशनशिवाय वाढीव कर LTCG 23 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे.