Fixed Deposit Rates: नमस्कार मित्रांनो भारतामध्ये गुंतवणूकदार आपल्या भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करत असतो हे आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ नागरिकासह अनेक जण मुदत ठेवी कडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत असते. आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत योग्य व्याजदर पाहून खातेदार मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक करत असतो.
व्याज दरात बदल केले तर गुंतवणूकदाराच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असते मागच्या दोन महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवर म्हणजे फिक्स डिपॉझिट दरामध्ये काही बदल केले आहे
या बँकांनी व्याज दरात बदल केले?
ह्या बँकांनी आपल्या व्याजदरामध्ये काही बदल केले आहेयूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि इतर बँकांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या व्याज दरात बदल केले आहे. यूनियन बँक आणि बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवर सर्वाधिक म्हणजेच ३३३ दिवसांसाठी ७.४० टक्क्यांचा व्याज दर देऊ केला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्ष आणि त्याहून अधिक) ०.५० टक्क्यांचा अधिकचा लाभ मिळणार आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांहून अधिक वय) ०.७५ टक्के अधिक व्याज तुम्हाला मिळेल अशी माहिती आहे, अशी माहिती इकॉनॉमिक मिळाली आहे.
Highest Fixed Deposite Rates In August 2024
पैसा बाजारवर यावर आलेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडौदा ३९९ दिवसांसाठी ७.२५ टक्क्यांचा व्याज दर देत आहे. बँक ऑफ इंडिया ६६६ दिवसांसाठी ७.३ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ७७७ दिवसांसाठी ७.२५ टक्के, कॅनरा बँक ४४४ दिवसांसाठी ७.२५ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४४४ दिवसांसाठी ७.३ टक्के, इंडियन बँक ४०० दिवसांसाठी ७.२५ टक्के, इंडियन ओव्हरसिस बँक ४४४ दिवसांसाठी ७.३ टक्के, पंजाब नॅशनल बँक ४०० दिवसांसाठी ७.२५ टक्के, ६६६ दिवसांसाठी पंजाब अँड सिंध बँक ७.३ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ४४४ दिवसांसाठी ७.२५ टक्के आणि यूनियन बँक ३३३ दिवसांसाठी ७.४ टक्के व्याज दर देत आहे.
विशेष मुदत ठेव योजन
बँक ऑफ इंडिया कडून विशेष मुदत ठेव योजनां घोषित केले आहे. त्यामध्ये तुम्ही दोन कोटी पर्यंतच्या ठेवीवर 666 दिवसासाठी सामान्य खातेदारांना 7.30% ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व अति जेष्ठ नागरिकांना 7.95% इतका व्याजदर देण्यात येणार आहे.तर स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत वृष्ष्टी या नावाने नवी मर्यादीत काळासाठीची मुदत ठेव योजना जाहीर केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृतृष्टी या नावाने नवीन मर्यादित काळासाठी मुदत ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेत जास्त माध्यमातून भारत व भारतीय खातेदारांसाठी अधिक व्याजदर देणाऱ्या बँका जाहीर केला आहे .