Army Jawan Pension : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपले जवान आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या सीमा सुरक्षित ठेवत असतात.
आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला पेन्शन देताना कोणत्या नियमाचा आधार घेतात आणि पेन्शन कोणाला मिळते याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Martyr Army Jawan Pension
मित्रांनो सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी शहीद जवानांच्या पेन्शन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अशावेळी शहीद जवानांच्या पत्नी आणि आई-वडिलांना पेन्शन विभागून देण्याचा विचार करत असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, आई-वडील आणि पत्नी यांच्यात कौटुंबिक निवृत्ती वेतन वाटपाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, त्यावर विचार केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
संरक्षण राज्यमंत्री यांनी सांगितले आहे की लष्कराने या विषयावर संरक्षण मंत्रालयात प्रस्ताव पाठवलेला आहे यामध्ये शहीद जवानांच्या पालकांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
ग्रॅच्युइटी,भविष्य निर्वाह निधी,विमा आणि एक्स-ग्रेशिया
मित्रांनो सध्याच्या नियमानुसार ग्रॅच्युइटी,भविष्य निर्वाह निधी,विमा आणि एक्स-ग्रेशियाची रक्कम शहीद सैनिकाच्या नामनिर्देशन किंवा इच्छापत्रानुसार दिली जातेअसे.परंतु विवाह झाल्यास, शहीदाच्या पत्नीला पेन्शनची रक्कम दिली जाते आणि अविवाहित शहीदाच्या पालकांना पेन्शनची रक्कम दिली जाते.
शहीद जवानांच्या पत्नी किंवा पालकांमध्ये निवृत्ती वेतनाचा लाभ कोणाला मिळावा या संदर्भात चर्चेचा मुद्दा मांडला आहे पत्नीला शहीद पैसेच अनेक सुविधा मिळाल्यानंतर आई-वडिलांना कोणताही आधार नसल्याच्या तक्रारी अनेक शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडून वतीने करण्यात येत आहेत.
मित्रांनो नुकतेच सियाचीन मध्ये शहीद झालेल्या जवान अंशुमन सिंग यांच्या पालकासंदर्भात हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करण्यात आला.मुलगा कॅप्टन अंशुमन यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले, तेव्हा शहीद अंशुमन यांची पत्नी कीर्ती चक्र घेऊन वडिलांच्या घरी निघून गेली. यानंतर अंशुमन सिंह यांच्या पालकांनी सरकारकडे NOK (नेक्स्ट ऑफ किन) चे नियम बदलण्यात यावे असी मागणी केली.
अनेक दिवसापासून लष्करातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी शहीद जवानाच्या पेन्शनसह बहुतांश सुविधा पत्नीला दिल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. शहीदांचे आई-वडील आधाराशिवाय राहत असल्यामुळे अलीकडच्या काळात या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.