Close Visit Mhshetkari

SBI ATM Franchise : स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत करा हा व्यवसाय आणि महिन्याला कमवा 80 हजार रुपये …

SBI ATM Franchise : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की,जगभरात सध्या बेरोजगारीचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे.अशा वेळेस आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पैसे कमावण्याचा एक मोठा स्त्रोत आज आपण पाहणार आहोत.आपण घरबसल्या 80 हजार रुपयापर्यंत कमाई करू शकता, तर काय आहे योजना पाहूया सविस्तर.

SBI ATM Franchise Business

मित्रांनो SBI च्या ATM फ्रँचायझीमधून तुम्ही हजारो रुपये कसे कमवू शकता. आता ही फ्रेंड्स आहे जी कशी मिळवायची पात्रता काय आणि कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता भासणार आहे याविषयी आपण चर्चा करूया. SBI ATM franchise कशी आणि कोणत्या आधारावर घेतली जाते हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

मित्रांनो आपल्याला सांगायचे झाल्यास कोणत्याही बँकेकडे स्वतंत्र एटीएम प्रणाली नसते,यासाठी एक वेगळी स्वतंत्र कंपनी असून बँकेद्वारे तिचे कंत्राट दिले जात. सदरील कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम बसवण्याचे काम करते.SBI ATM फ्रँचायझी मिळवून तुम्ही चांगली कमाई कशी करू शकता ते आता या लेखात जाणून घ्या.

SBI ATM Franchise Terms and Condition

एसबीआय एटीएम फ्रँचायझी अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

  • SBI ATM सेट करण्यासाठी आपल्याला काही अटी वर्षाचे पालन करणे आवश्यक आहे.
  • एसबीआय एटीएम फ्रँचायझी मिळवण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 80 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जागा किंवा गाळा असणे आवश्यक आहे.
  • एसबीआय एटीएम आणि इतर एटीएममधील अंतर 100 मीटर असावे.
  • ATM ची जागा ही तळमजल्यावर आणि लगेच दिसण्यात येईल अशी असावी.
  • एटीएम सेट करायचा ठिकाणी 24 तास 1 KW चे वीज पुरवठा असणे आवश्यक असणार आहे.
  • दररोज सुमारे 300 व्यवहारांची या एटीएमची क्षमता असावी.
  • एटीएम सेट करण्यासाठी पक्के म्हणजे स्लॅबचे ठिकाण किंवा खोली असणे आवश्यक आहे. 
  • V-SET च्या स्थापनेसाठी असोसिएशन किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
हे पण वाचा ~  SBI Hike Loan : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने वाढवले कर्जाचे दर; आज पासून वाढणार तुमचा EMI

SBI ATM Franchise Documents

SBI ATM फ्रँचायझी मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

  • ओळखपत्र : पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड, वीज बिल
  • बँक खाते सोबत पासबुक
  • फोटो, ईमेल ऍड्रेस,मोबाईल नंबर
  • GST क्रमांक
  • आर्थिक कागदपत्रे
How to Apply SBI ATM Franchise ?

SBI ATM फ्रँचायझी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन तुम्ही फ्रँचायझी साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.भारतात Muthoot ATM, Tala Indicash,India One ATM यांना एटीएम बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. सबंधित सर्व कंपन्यांच्या official portal वर भेट देऊन आपण आपल्या ATM फ्रँचायझी साठी अर्ज करून शकता.

तुम्ही किती कमाई कराल ?

स्टेट बँक ऑफ इंडिया फ्रँचायझीसह तुम्ही प्रत्येक महिन्याला सुमारे ₹80,000 कमावू शकता. ड्रॉवर ट्रांजेक्शन साठी प्रत्येकी 8 रुपये आणि बॅलन्स चेक साठी 2 रुपये मिळतत.

दररोज आपल्या एटीएम मध्ये 500 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन झाले, तर आपल्याला महिन्याला 80 हजार रुपये इन्कम सुरू होऊ शकतो…. SBI ATM Franchisee

Leave a Comment

error: Content is protected !!