Electric Scooter : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांचे खरेदी आजकाल वाढलेले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारे इलेक्ट्रिक वाहन म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर.
आता दसरा दिवाळीच्या तोंडावर इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांची संख्या लक्ष्मी वाढलेली दिसून येत आहे अशावेळी इलेक्ट्रिक स्कूटर मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी सर्वोत्कृष्ट आणि जास्त काळजी केली याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महाग पार्ट म्हणजे बॅटरी.
Electric Scooter Battery Warranty
सध्या मार्केटमध्ये Ola, Ather आणि TVS सारख्या बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देत आहेत. अशावेळी कोणत्या स्कूटरची बॅटरी सुरक्षित आणि अधिक शक्तिशाली असेल ड्राईंग रेंज कोणत्या स्कूटरला जास्त मिळेल याविषयी माहिती आपल्याला असायला हवी तर आपण या तीन महत्त्वाच्या स्कूटरचा बॅटरी विषयी खालील तक्त्यांच्या आधारे माहिती पाहूया.
Ola Scooter : जर तुम्ही ओला इलेक्ट्रिककडून नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कंपनीकडून 8 वर्षे/80,000 किमी पर्यंतच्या वॉरंटीचा लाभ मिळेल.
Ather Scooter : ॲथर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षे/30 हजार KM पर्यंतची वॉरंटी देते. आपण Ather Battery Protect Plan स्वतंत्रपणे खरेदी करू शकता आणि बॅटरीची वॉरंटी 5 वर्षे/60 हजार KM पर्यंत वाढवू शकतो.
TVS Scooter : टीव्हीएस कंपनीकडे इलेक्ट्रिक स्कूटर देखील आहे, जी कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या स्कूटरचे नाव TVS iQube आहे. सदरील इलेक्ट्रिक स्कूटर 3 वर्षे/50 हजार KM पर्यंतच्या वॉरंटीसह येते.स्कूटर खरेदी करताना तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास, तुम्हाला 5 वर्षे/70 हजार KM पर्यंत बॅटरी वॉरंटीचा लाभ मिळेल.
Electric Vehicle tips
मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर,बाईक किंवा वाहन घेताना बॅटरी संदर्भात शोरूममधील सेल्स एक्झिक्युटिव्हकडून बॅटरीच्या वॉरंटी विषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी.