Close Visit Mhshetkari

School Holidays : शैक्षणिक …. राज्यातील शाळांच्या सुट्या कमी होणार; काय आहे नवीन धोरण ? पहा सविस्तर …

School Holidays : नमस्कार मित्रांनो,शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदने अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिलेली आहे.

School Holidays new Update

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय – राज्य सुट्या, सत्र सुटी, अन्य सुट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे.

थोडक्यात सदरील अहवाल स्वीकारल्यानंतर शाळाचे एकूण कामकाजाचा वेळ वाढणार आहे हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागणार आहेत त्याचबरोबर अभ्यासक्रमात सुद्धा मोठा बदल करण्याची संकेत सदरील अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यास सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यात राज्य मंडळाच्या शाळांसाठीही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSC) वार्षिक वेळापत्रक लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

CBSC शी संलग्न शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिल रोजी सुरू होऊन ३१ मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो. शाळांना मे महिन्यामध्ये सुट्टी आणि सत्र संपल्यानंतर राष्ट्रीय सण समारंभ या अनुषंगाने ठराविक कालावधीत दीर्घ सुट्ट्या देण्यात येतात.

साधारणपणे मे महिन्यातील सुटीनंतर शाळा १ जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात.CBSC संलग्न शाळा भारतभर आणि भारताबाहेरही सुरू आहेत. थोडक्यात उत्तर भारतातील अति थंड किंवा अति उष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये, अतिवृष्टीप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक समान असल्याचे दिसून येते, असे नमूद करण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  School Holiday : मोठी बातमी ... राज्यातील शाळांना तब्बल ३ दिवस सुट्टी ? आयुक्त तसेच उपसचिवांकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ...

New Education Policy 2024

महाराष्ट्रात सद्यस्थितीत शाळांच्या वेळेचा विचार करायचा झाल्यास सहा ते साडेसहा तास शाळा भरतात तर अध्यापनासाठी चार ते साडेचार तास उपलब्ध असतात इमारत अपुरी असल्यामुळे किंवा विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे काही शाळा दोन सत्रात भरतात अशा शाळांना आता वेळेच्या उपलब्ध संदर्भात विचार करावा लागणार आहे.कारण अशा दोन सत्रांतील शाळांना दिवसाला जास्तीत जास्त साडेपाच तास उपलब्ध असतात.

NEP 2020 (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा) नुसार दैनंदिन 5 ते 6.5 तास अध्यापन होणे आवश्यक आहे. तिसरी ते पाचवीसाठी घड्याळी 1 हजार तास,सहावी ते दहावीसाठी घड्याळी 1 हजार 200 तास शैक्षणिक कामकाज होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.

CBSC शाळांतील गुणवत्तेचे तर्क

CBSC च्या शाळांमध्ये खूप दीर्घ सुट्या न देता अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,उपक्रम सुरू ठेवल्यामुळे सदरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे तर्क राज्य अभ्यासक्रम आराखड्यात लावण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!