Home Loan : प्रत्येकाला असे वाटते की आपले एक स्वतःच घर असावं .आणि ही सगळ्यांचीच इच्छा असते. बरेच जण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घेत असतात. परंतु तुम्ही हे होम लोनचे व्याज मोठ्या प्रमाणावर भरत असता अशा वेळी तुम्ही जर काही पैसे बचत करून गुंतवणूक केली. तर म्हणजेच तुम्ही जर SIP मध्ये योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुमच्या गृह कर्जाच्या व्याजाइतके पैसे तुम्हाला सहज मिळू शकतात.
Home Loan With SIP
समजा तुम्ही जर 20 वर्षाकरिता 50 लाख रुपये कर्ज घेतले व या कर्जावर तुम्हाला 9 टक्के व्याज असेल तर दरमहा सुमारे 45 हजार तुम्हाला भरावा लागेल . तुम्ही जर कर्ज संपेपर्यंत आधी सुमारे 58 लाख रुपये व्याज भरले आहे म्हणजेच तुम्ही मूळ रक्कम व्याजासह एकूण 1.o8 कोटी रुपये भरले आहे.
ज्यावेळी तुम्ही होम लोन घेता त्यावेळीच तुम्हाला काही रक्कमेचा एसआयपी सुरू करावी लागेल. असं केल्यास तुमचे व्याज कव्हर होऊ शकते.
तुम्ही जर तुमच्या होम लोन च्या व्याजाच्या 10 टक्के रक्कम SIP मध्ये गुंतवली तर म्हणजे तुम्ही SIP मध्ये 4500 रुपये गुंतवले असते तर ही SIP वीस वर्षे चालेल आणि वार्षिक सरासरी 14 ते 15 टक्के परतवा मिळत असेल तर वीस वर्षांमध्ये सुमारे 65 लाख रुपये तुमचे तयार होतील.
65 लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्ही वीस वर्षांमध्ये सुमारे 12 लाख रुपये गुंतवणूक असतील परंतु उर्वरित 53 लाख रुपये तुमची व्याजाची कमाई असणार आहे.हा तुमचा सर्वात मोठा फायदा असेल. अशाप्रकारे तुम्ही जर गुंतवणूक केली तर होम लोन व्याजाची परत रक्कम तुम्हाला मिळेल व अधिकाधिक फायदा होईल.