Close Visit Mhshetkari

Aadhaar Card Verification :तुमचं आधार कार्ड बनवट आहे की खरे ; UIDAI च्या मदतीने ओळखा

Aadhaar Card Verification : आधार कार्ड हे आजच्या काळामध्ये एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते हे आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीकडे असले पाहिजे . आधार कार्ड हे तुमचे ओळखपत्र म्हणून काम करते. आधार कार्ड चे महत्व लक्षात घेऊन काही लोक बनवतात बनवत आहेत.

यामुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणे आवश्यक आहे.तुम्हाला जर तुमचा आधार कार्डची सत्यता तपासायची असेल तर त्यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट वापरावी लागेल म्हणजेच UIDAI

Aadhaar Card Verification Online

आधार कार्ड हे तुमचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे यामुळे तुमच्या आधार कार्ड ची सत्यता तपासणी अतिशय महत्त्वाचे आहे कारण चोरीपासून संरक्षण करण्यासाठी व गैरव्यवहार टाळण्यासाठी आधार कार्डची सत्यता तपासणी अतिशय गरजेचे आहे. आधार कार्डची सत्यता कशी तपासायची आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. 

अशी करा आधार कार्डची पडताळणी 

  1. तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/verify वर जावे लागेल. या 
  2. लिंकवर जाऊन तुम्ही थेट तुमचे आधार कार्ड तपासू शकता.
  3. येथे तुम्हाला ‘My Aadhaar’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला आधार सेवा विभागात जावे लागेल.
  4. आधार पडताळणी विभागात जावे लागेल. येथे गेल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. .
  5. पेजवर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या व्हेरिफिकेशन बटणावर क्लिक करावे लागेल. 
  6. तुम्ही हे केल्यावर तुमच्या आधार कार्डची स्थिती तुमच्या समोर दिसेल, यामुळे तुमचे आधार कार्ड खरे आहे की खोटे हे तुम्हाला काही मिनिटातच कळेल.
हे पण वाचा ~  Aadhar Card Update : तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता किती वेळा बदलता येतो ? घ्या जाणून सविस्तर माहिती

आधार कार्ड विषयी घ्यायची काळजी

  • तुमच्या आधार कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
  • आधार कार्डची सत्यता तपासण्यासाठी नेहमी UIDAI ची अधिकृत वेबसाइट वापरा.
  • तुमचे आधार कार्ड बनावट असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, लगेच UIDAI शी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा.
  • आधार कार्डची सत्यता तपासण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सोयीची आहे. यासाठी तुम्हाला फक्त UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

अशा प्रकारे, तुमचे आधार कार्ड खरे आहे की खोटे हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!