Aadhaar Pan Card : आजकालच्या जमान्यात कोणतेही सरकारी काम म्हणा किंवा इतर कोणतेही काम असो प्रत्येकाकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे असतात.
बँक खाते उघडण्यापासून ते सर्व कामांसाठी त्यांची गरज असते. सदरील कागदपत्रे तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतात.
पण मित्रांनो जर आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले तर या कागदपत्रांचे काय करावे ?
Aadhaar Card Pan Card
मतदार ओळखपत्र : – मतदान कार्डाच्या माध्यमातूनच मतदान करण्याची संधी मिळते. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर आपण त्याचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकतो. आपल्याला गावातील किंवा मतदार क्षेत्रातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्याकडे फॉर्म-७ भरावा लागेल, त्यानंतर हे कार्ड रद्द होईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृतव्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.
आधार कार्ड : – आधार कार्ड रद्द करने किंवा परत करण्याची कोणतीही सुविधा नाही, पण आपण आपले आधारकार्ड लॉक करू शकतो. आधार कार्ड लॉक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in वर जावे लागेल.
‘माय आधार’ ऑप्शन निवड केल्यानंतर ‘आधार सर्व्हिसेस’वर क्लिक करून लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा.
आता येथे १२ अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड टाका. यासोबतच सेंड ओटीपी ऑप्शन सिलेक्ट करा. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून बायोमेट्रिक डेटा लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय निवडू शकता.
Pan Card : Income Tax पासून बँक आणि डीमॅट खाते उघडण्यासारख्या सर्व कामांमध्ये पॅनकार्ड आवश्यकता असते. जर पॅनकार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी त्याचे कार्ड परत करावे लागते. मृतकाच्या कुटुंबीयांना इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधावा. पॅनकार्ड परत करण्यापूर्वी मृतक व्यक्तीची सर्व खाती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित किंवा बंद करावेत.
Passport :- सध्या पासपोर्ट रद्द करण्याची कोणतीही सुविधा नाही. पासपोर्टची कालमर्यादा संपल्यानंतर ते अवैधय ठरत असते.पासपोर्टची डेडलाईन संपेपर्यंत पासपोर्ट सांभाळून ठेवावा, जेणेकरून तो कोणत्याही चुकीच्या हातात पडणार नाही.