Additional Pension : केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांना अतिरिक्त पेन्शन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिलेली आहे. काय आहे बातमी? पाहूया सविस्तर
Additional Pension Calculator
मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठे युद्ध दिलेले आहे आता केंद्र सरकारने 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा भत्ता रूपाने अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिली. मित्रांनो सदरील अतिरिक्त पेन्शन पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जन्मतारीख घटक धरण्यात येणार आहे. थोडक्यात वयाचा 80 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचार्याला अतिरिक्त पेन्शनची लॉटरी लागणार आहे.
आता वयाच्या 80 व्या वर्षी, वाढदिवस साजरा करणाऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेन्शन लागू होईल. थोडक्यात एखाद्या कर्मचाऱ्यांची जन्मतारीख 20 ऑगस्ट, 1942 रोजी झाला असेल तर त्याला पेन्शनची अतिरिक्त रक्कम 1 ऑगस्ट, 2022 रोजीपासून मिळणार आहे.निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिली आहे.
अतिरिक्त पेन्शनचा लाभ
- साधारणपणे 80 वर्ष वय असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 20 % पेन्शन रक्कम वाढ
- 85 ते 90 वर्षादरम्यान 30 % पेन्शन रक्कम वाढ
- 90 ते 95 वर्षादरम्यान 40 % पेन्शन रक्कम वाढ
- 100 वर्ष आणि त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनाच्या 100 % पेन्शन मिळणार आहे.
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने याविषयीची माहिती दिली आहे.विभागाने त्यासाठी परिपत्रक काढले आहे.
सदरील परिपत्रकामध्ये पेन्शनची स्थिती, तारीख आणि त्याचे गणित समजावून सांगण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांचे संबंधित सर्व विभाग बँकांना या संदर्भात सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत..