Close Visit Mhshetkari

Bank Loan : मोठी बातमी… ‘या ‘ बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ ! आता या कर्जाचे EMI वाढणार ?

Bank Loan : देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांना दिवाळीनंतर झटका बसला आहे.HDFC बँकेने ठराविक कालावधीच्या कर्जावरील MCLR मध्ये वाढ केली आहे.

जर तुम्ही कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता कर्ज जास्त व्याजदराने मिळणार आहे. म्हणजेच कर्जावरील व्याज पूर्वीपेक्षा जास्त भरावे लागणार आहे. याशिवाय ज्यांचे आधीच कर्ज सुरू आहे, त्यांच्या मासिक हप्ता वाढणार आहे.

HDFC Bank Loan Interest Rate

एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआरमधील बदलांमुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जाच्या हप्त्यावर परिणाम होणार आहे.साधारपणे एमसीएलआर वाढला की, कर्जाचे व्याजदर वाढून विद्यमान ग्राहकांचा EMI वाढणार आहे. 

सदरील व्याजदर ७ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेनं सहा महिने आणि तीन वर्षांच्या कालावधीत MCLR मध्ये ०.०५ % वाढ केली आहे.फंड बेस्ड लेंडिंग रेट एमसीएलआर बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ९.१५% ते ९.५०% दरम्यान आहे.

हे पण वाचा ~  HDFC Credit Card : क्रेडिट कार्डधारकांच्या खिशावर होणार परिणाम ? कसा तो पहा..

HDFC Bank MCLR Rate

  • एचडीएफसी बँकेचा MCLR ९.१० % वरून ९.१५ % वर पोहोचला आहे.
  • एका महिन्यात MCLR ९.१५ % वरून ९.२० % वर गेला.
  • तीन महिन्यांचा MCLR ९.३० % असून त्यात बदल करण्यात आला नाही.
  • तर सहा महिन्यांचा MCLR ९.४५ % आहे. त्यातही बदल करण्यात आला नाही.
  • एक वर्षाचा MCLR ९.४५ % आहे. त्यात बदल करण्यात आला नाही.
  • २ वर्षांहून अधिक काळासाठी MCLR ९.४५ % आहे. त्यातही बदल करण्यात आला नाही.
  • ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR ९.५० % आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!