Bhu Aadhar Scheme : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकताच केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024 सादर केलेला आहे त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागासाठी लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वाची पावलं उचललेली आहेत तर चला मित्रांनो पाहूया आधार म्हणजे काय आणि याची काय होणार आहे फायदे?
केंद्र सरकारने Union Budget 2024-25 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
What is Bhu Aadhaar ?
ग्रामीण भागातील जमिनीसाठी सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा भू आधार प्रणाली विकसित केलेली असून सर्व नागरी जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव आहे.आगामी तीन वर्षात या लँड रिफॉर्म्स पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना आर्थिक मदत करणार आहे. जमिनीच्या या भू आधार प्रणाली द्वारे जमिनीचे वाद संपुष्टात येऊन मालकी सिद्ध करण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.
मित्रांनो भू आधार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना एक 14 अंकी क्रमांक यालाच युनिक एडिटिफिकेशन नंबर म्हणतात हा दिला जाणार आहे. हा ULPIN म्हणून ओळखला जातो.
Digital Online land Record
आपल्या जमिनीच्या ओळख क्रमांकासह मालकी व शेतकऱ्यांच्या रजिस्ट्रेशन मॅपिंग इंटरनेट सुद्धा बदल करण्यात येणार सदरील प्रक्रियेमुळे किंवा प्रणालीमुळे विविध योजनांचा लाभ घेणे असो कृषी कर्ज घेणे असो अतिशय सोपे होणार आहे.
भारतातील Digital land Record करण्यासाठी आणि एकात्मिक भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यासाठी सरकारनं २००८ मध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला.
GPS Mapping for urban Area
मित्रांनो GPS Mapping प्रणाली द्वारे शहरातील जमिनीची नोंदणी सुद्धा डिजिटल पद्धतीने होणार आहे यामध्ये मालमत्ता अभिलेखे प्रशासन अपडेट करणार असून टॅक्स आधारित प्रणाली उभारण्यात येणार आहे. परिणामी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
- आपल्या शेत जमिनीचे नेमके भौगोलिक स्थान ओळखण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर जिओ टॅग द्वारे केला जातो.
- सर्वेक्षण करून प्रत्यक्ष पडताळणी करून भूखंडाच्या हद्दी मोजल्या जातात.
- भूखंडासाठी जमीन मालकाचे नाव, वापराची श्रेणी, क्षेत्रफळ आदी तपशील गोळा केले जातात.
- सर्वेक्षण केलेल्या सर्व तपशीलांचा भूमि अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये संग्रहित करून व्यवस्थापन केले जाते
- भू – आधार प्रणाली भूखंडासाठी आपोआप 14 अंकी भू-आधार क्रमांक तयार करुन डिजिटल रेकॉर्डशी जोडते.
भू-आधारचे फायदे काय?
- जीपीएस मॅपिंगसह मोजमापाकाद्वारे प्रत्यक्ष नोंदणी केल्यामुळे जमिनीची अचूक आणि सुनिश्चित नोंद केली जाते.
- शेतकऱ्यांच्या भूखंडाच्या ओळखीबाबत संविधा दूर करून जमिनीमध्ये असलेले वाद आपोआप मिटवले जातात.
- आधार कार्ड ची लिंक केल्यानंतर जमिनीची ऑनलाइन नोंदणी होऊन एक 14 अंकी क्रमांक मिळतो.
- शेतकऱ्याला केव्हा आपल्या जमिनीचा इतिहास त्याचबरोबर मानवी सिद्ध करण्यासाठी सदरील तपशील ट्रॅक करता येतो.
- सरकारी योजना त्याचबरोबर इतर धोरण ठरवण्यासाठी सरकारला अचूक आकडेवारी प्राप्त होते.