Close Visit Mhshetkari

Car Loan EMI: नवरात्रीपर्यंत कार घेण्याचा प्लॅन करताय ? लगेच चेक करा 10 लाखांपर्यंतच्या कारलोनवर किती भरावा लागेल हप्ता …

Car Loan EMI : नमस्कार मित्रांनो आपल्याला जर नवरात्र आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कार घ्यायची असेल ,आणि कारण संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. आपण 10 लाख रुपयापर्यंत घेतल्यानंतर किती हप्त बसेल कोणत्या बँकेत सद्यस्थितीत व्याजदर कमी आहे याविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

Car Loan Interest Rate 2024

Union Bank of India : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली बँक म्हणजे युनियन बँक युनियन बँकेतर्फे 10 लाख रुपये कारलून घेतल्यानंतर 8.70% व्याजराने आपल्याला चार वर्षासाठी 24565 रुपये EMI बसू शकतो.

SBI Car loan : देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सदरील बँकेत सद्यस्थितीमध्ये 8.75 दराने कारन सुरू आहे मित्रांनो आपण जर चार वर्षासाठी बँकेकडून दहा लाख रुपयाच कार लोन घेतल्यास आपल्याला 24 हजार 587 रुपये हप्ता बसेल. सध्या पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकही याच व्याजदरानं कार लोन देत आहेत.

हे पण वाचा ~  Car Loan : SBI बँकेकडून 6 लाखाचे कार लोन घेतल्यावर दरमहा EMI आणि व्याज किती भरावे लागेल ? जाणून घ्या सविस्तर ...

Bank Of India : बँक ऑफ इंडिया ८.८५ % व्याजदराने कार लोन देत आहे. आपल्याला दरमहा २४,६३२ रुपयांचा EMI भरावा लागेल.

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा ४ वर्षांसाठी ८.९० % व्याजदराने कार लोन देत आहे. आपल्याला EMI २४,६५५ रुपये बसेल.

ICICI Bank : आयसीआयसीआय बँक ९.१० % व्याजदराने ४ वर्षांसाठी १० लाख रुपयांचे कार लोन देत आहे. आपला मासिक हप्ता २४,७४५ रुपये असेल.

Axis Bank : ॲक्सिस बँक ९.३० % व्याजदराने कार लोन देत आहे. चार वर्षासाठी या लोनचा हप्ता २४,८३५ रुपये असेल.

HDFC Bank : एचडीएफसी बँक ९.४० % व्याजदराने १० लाख रुपयांचे कार लोन देत आहे. यासाठी आपल्याला २४,८८१ रुपयांचा मासिक एमी भरावा लागेल.

(टीप : सदरील माहिती शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांपूर्वी बँकांकडून योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्याजदर संदर्भात सखोल चौकशी करावी. व्याजदरांमध्ये बँकांनुसार बदल होऊ शकतो.)

Leave a Comment

error: Content is protected !!