Cotton Soybean Madat : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सरकारने नुकतेच 2023 साला साठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केलेली आहे अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात मोठ्या समस्या निर्माण होत आहे पहिली गोष्ट म्हणजे ई- पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सदरील मदत मिळणार आहे.
Cotton Soybean Madat list
मित्रांनो आपल्याला माहीत आहे की, कापूस, सोयाबीन मदत बाबतीत खालील समस्या आहेत.
ई-पीक पाहणी केली पण सरकारने प्रसिध्द केलेल्या यादीत नाव आले नाही,दोन्ही पिकांची नोंद ई-पीक पाहणी यादीत केली होती,पण एकाच पिकाच्या यादीत नावे आले,दोन्ही पीक असताना दुसऱ्या पिकाच्या यादीत नाव नाही.मग आम्हाला एकाच पिकासाठी मदत मिळणार की नवी यादी येणार?
आतापर्यंत सरकार पीकविमा, एनडीआरएफची भरपाई थेट खात्यात जमा करत असते.आता मात्र कापूस आणि सोयाबीनच्या मदतीसाठी नव्याने आधारकार्ड, संमतीपत्र का घेत आहे? असे महत्वाचे 3 प्रश्न बहुतांशी शेतकऱ्यांना पडले आहेत.शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे कृषी आयुक्तालयाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5 हजार रुपये मदतीसाठी 2023 मध्ये ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.कृषी आयुक्तालयाने सांगितले की, ई-पीक पहणी किंवा पिकांची नोंद महसूल विभाग करते. पण कापूस आणि सोयाबीन मदतीची योजना कृषी विभागाची आहे. परिणामी कृषी विभागाने महसूल विभागाकडून मागील वर्षी ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली आहे.
आता महसूल विभागाने दिलेलीच यादी कृषी विभागाने प्रसिध्द केलीआहे.सदरील यादीत कृषी विभागाने कोणताही बदल केले नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
कापूस सोयाबीन यादीत नाव कसे टाकावे ?
जर पिकांप्रमाने ई-पीक पाहणी करूनही यादीत शेतकऱ्यांचे नाव नसेल,कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीकं असताना एकाच पिकाच्या यादीत नाव असेल, तर शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे संपर्क साधावा.
जर शेतकऱ्यांची खरंच अडचण असेल तर महसूल विभाग ई-पीक पाहणीच्या नोंदी पुन्हा तपासतील आणि तशी सुधारित यादी पाठवण्यात येईल.
तांत्रिक कारणाने शेतकऱ्यांची माहीती मिळत नसेल तर महसूल विभागाने सबंधित शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची ई-पीक पाहणी केली होती ? हे सुचविले तरी या शेतकऱ्यांचा समावेश मदतीसाठी पात्र ठऱलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल,असे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
आपले नाव मदत यादीत नसेल किंवा एकाच पिकाच्या यादीत असेल तर तुम्ही तलाठ्यांकडे यासंबंधीची तक्रार करून आपले नाव मदत यादीत समाविष्ठ करण्याची सूचना करू शकता.
आधार संमतीपत्राविषयी कृषी आयुक्तालयाने सांगितले की,पीकविमा आणि एनडीआरएफची मदत शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मिळत आहे. सदरील योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारचा वापर करण्याची संमती सुरवातीला घेतली आहे. आता या योजनेचे पैसे आधारसंलग्न खात्यात टाकायचे असल्याने आधार वापरचे संमतीपत्र घेणे बंधनकारक असते.
कापूस सोयाबीन मदत यादी दुरुस्ती प्रोसेस
सोयाबीन व कापूस अनुदान यादीत तीच नाव आहेत ज्यांनी 2023- 24 या आर्थिक वर्षात ई पीक पाहणी द्वारे सदर पिकांची नोंद केलेली आहे.. यादीत जर नाव नसेल तर ऑनलाईन(Mahabhulekh.gov.in)किंवा तलाठ्याकडे जाऊन सातबारा काढा त्यावर 2023 -24 कापूस किंवा सोयाबीन नोंद आहे का ते तपासा, नोंद असल्यास आणि अनुदान यादीत नाव नसल्यास , सातबारा प्रत आणि एक विनंती अर्ज संबंधित Ato officer क्रुषी आधिकारी यांना द्यावा..