Credit Score : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजकालच्या काळामध्ये डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.याशिवाय लहान-मोठे कर्ज सुद्धा बरेच लोक घेत असतात.
Credit Score Increases Tips
आपल्याकडून एखाद्या वेळेस डेबिट तसेच क्रेडिट कार्डांचा हप्ता मिस होतो आणि याचा परिणाम थेट आपल्या क्रेडिट स्पोर्ट वरती होत असतो.अशावेळी आपला किड्स स्पोर्ट कमी होतो.क्रेडिट स्कोअर नकारात्मक असल्यास याचा फटका त्यांच्या कर्ज काढण्याच्या क्षमतेवर होतो.
आपला क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यास नकार कळवतात. यामुळे क्रेडिट स्कोअर नेमका का सुधारत नाही, या चिंतेने हैराण होतात.अशावेळी आपल्या क्रेडिट हिस्टरी चांगले राहण्यासाठी पुढील बाबींचा विचार आपण सदैव केला पाहिजे.
High credits Utilities : आपण बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतले असेल तर त्याचा वापर आपण मर्यादित ठेवला पाहिजे मित्रांनो 80 टक्के पेक्षा जास्त मर्यादा आपण क्रॉस केल्यानंतर याचा वाईट परिणाम आपल्या क्रेडिट सिस्टर होत असतो साधारणपणे 30% पर्यंत खर्च केल्यास आपल्या क्रेडिट स्कोर वाढीस मदत मिळते.
Different types of loan : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कर्जाचे वेगवेगळे प्रकार पडतात ज्यामध्ये होम लोन पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड याचा समावेश असतो.आपला क्रेडिट स्कोर चांगला करायचा असल्यास, या सगळ्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आपल्या क्रेडिट हिस्टरी मध्ये असायला हवा विशेष म्हणजे सर्व व्यवहार सुरळीत चाललेले असावे आणि कोणताही हप्ता मिस होऊ नये.
Enquiry of loan : बरेच लोक एखाद्या बँकेकडून कर्ज न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या बँकेत कर्जांची चौकशी करतात किंवा मागणी करतात.प्रत्येक वेळा तुमचा सिबिल स्कोर पडताळणी केल्या जातो. त्यामुळे आपल्या क्रेडिट स्कोर वरती वाईट परिणाम होत असतो, तेव्हा एखाद्या बँकेने कर्ज रक्कम देण्यास नकार दिल्यास, एक दोन महिने वाट पाहून नंतर कर्ज मागणी करावी.
Credit Card Report : आपण केलेल्या व्यवहारावर आणि खर्चाचा तपशिल कार्डच्या स्टेटमेंटमध्ये असावा. क्रेडिट कार्डच्या वापरा संदर्भात सतत पडताळणी केली पाहिजे. अन्य कोणत्याही संशयास्पद व्यवहाराचा त्यात समावेश असेल, तर त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर घटतो.
Loan Guaranteed : अनेक वेळा आपण मित्र किंवा नातेवाईकांना कर्ज रकमेसाठी जामीनदार होतो. काही कारणांनी त्यांच्याकडून कर्ज रक्कम परत होत नाही,परिणामी त्याचा वाईट परिणाम आपल्या सिबिल स्कोर वरती होतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला जमीनदार होण्यापूर्वी काळजी घ्यावी.
आपला सिबिल स्कोर येथे चेक करा ➡️ Free Cibil Score