Close Visit Mhshetkari

Credit Score : मोठी बातमी… रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ची मोठी घोषणा; आता तुमचा सिबील स्कोअर होणार ….

Credit Score : रिझर्व बँक ऑफ इंडियाने RBI कर्जविषयक माहितीबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, कर्जदात्याला म्हणजेच कर्जपुरवठा कंपन्या किंवा वित्तीय संस्थांना आता प्रत्येक पंधरावा कर्ज संबंधीची माहिती क्रेडिट कंपन्यांना अर्थात CICs क्रेडिट कंपन्यांना देणे बंधनकारक असणार आहे.

Credit Score New Updates

प्रत्येक ग्राहकांचा क्रेडिट स्कोर हा 300 वरून साडेसातशे पर्यंत जावा असा प्रयत्न करावा यावर शक्तिकांत दास यांनी भर दिला आहे.गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भर दिला की, वेळेवर कर्जविषयक माहितीचा खुलासा होणे कर्जदारांसाठी फायदेशीर ठरत असतो. “पंधरवड्याच्या अंतराने अहवाल सादर केल्याने CICs कडून सादर केल्याने क्रेडिट हिस्टरी संदर्भात ताजी माहिती कर्जपुरवठा करणाऱ्या बँका किंवा वित्त संस्थांना होणार आहे. 

सदरील बाब कर्जदार आणि कर्जदाते (CIs) दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. आपल्याला माहिती असेल की कर्जदाराने कर्जफेड केल्यानंतर बरेच दिवस त्याच्या क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट हिस्टरी अपडेट केली जात नाही. परिणामी अन्य व्यवहार करण्यासाठी कर्जदाराला आणि कर्जदात्याला दोघांनाही अडचण येते.

अशावेळी कर्जदाराकडून NDC/NOC मागितली जाते. असे असले तरी क्रेडिट रिपोर्ट मात्र पूर्वीचा ग्राह्य धरण्यात येतो.परिणामी ग्राहकाला काही दिवस वाट पहावी लागते अथवा क्रेडिट रिपोर्ट खराब असल्यास जास्त व्याजदराने खर्च घ्यावे लागते.

Benefits of good Credid Score 

कर्जविषयक जसे की कर्ज आणि क्रेडिट कार्ड बाबत अचूक माहिती कर्जदार आणि कर्जत ते या दोघांना मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे आपला क्रेडिट स्कोर होय.सध्या कर्जदाते CICs ना मासिक किंवा ठरलेल्या अंतराने कर्जविषयक माहिती सादर करतात. 

हे पण वाचा ~  Credit Score : हप्ते वेळेवर तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह कसा ? ‘या’ 5 कारणामुळे बसतो फटका ...

आता सदरील माहिती पंधरवण्याच्या अंतराने किंवा कमीत कमी अंतराने सादर करण्याच्या सूचना आरबीआयकडून मिळाल्यामुळे लोकांनाही याचा फायदा होणार असून कर्ज विषयक हिस्टरी लवकर किंवा जलद मार्गाने अपडेट होईल विशेष म्हणजे ज्यांनी कर्जाची परतफेड केली असेल त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे.

क्रेडिट कार्डसाठी चांगला CIBIL स्कोर काय असतो?

अर्थतज्ज्ञांच्या मते, सदरील घोषणेमुळे ग्राहकांच्या वादांचा जलद गतीने होईल. ट्रान्सयुनियन CIBIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO राजेश कुमार यांनी सांगितले की, “ही एक अत्यंत प्रगतीशील पाऊल आहे, ज्यामुळे कर्जविषयक माहितीच्या प्रणालीला मोठे बळ मिळेल.

CIBIL स्कोअर लवकर कसा सुधारायचा ?

  • आपला सिबिल स्कोर साठी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरत असते.
  • ज्यामध्ये आपण घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर परतफेड करणे.
  • कर्जासाठी वारंवार चौकशी न करणे 
  • आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित म्हणजे 80% पेक्षा कमी ठेवणे
  • एखाद्या कर्जासाठी जमीनदार होणारा होताना विचार करून व्हावे, त्यांचे हप्ते चुकणार ना
  • ही याची काळजी घ्यावी.

1 thought on “Credit Score : मोठी बातमी… रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ची मोठी घोषणा; आता तुमचा सिबील स्कोअर होणार ….”

  1. सर्व लोकांना मूर्ख बनविणारे मेसेज असून फक्त सरकारच्या कामगिरीचे महत्व पटवून देणारे मेसेज असून तळागाळातील लोकांना याचा कुठलाच फायदा मिळत नाही

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!