Close Visit Mhshetkari

DA Hike 2024 : कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यात 3 % वाढीसह मिळणार 3 महिन्यांची थकबाकी ! पहा किती वाढणार पगार ?

DA Hike 2024 : दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. 

DA Hike Salary 2024

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असला तरी, केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही डीए वाढीची घोषणा केली जाईल. डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील ही तीन टक्के आहे. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पगार किती वाढणार?

डीए वाढ जुलै महिन्यापासून लागू केली आहे. ऑक्टोंबर महिन्याचे मिळवल्यास चार महिन्यांचा डिओ मिळणार आहे. म्हणजे 40 हजार मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 60 हजार रुपये होत होतो. परंतु ऑक्टोंबर महिन्यांत चार महिन्यांचा फरक मिळून हा पगार 4 हजार 800 रुपये वाढणार आहे.म्हणजे 64,800 रुपये पगार ऑक्टोंबर महिन्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  State Employees : सोन्याहून पिवळं; केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही मिळणार दणदणीत वेतनवाढ? पहा कसा होईल फायदा ?

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते.जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता,तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थकबाकीचे किती पैसे मिळतील ?

जसे आम्ही तुम्हाला सांगितले की, 40 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला 3 % डीए वाढीवर दरमहा 1 हजार 200 रुपये अतिरिक्त महागाई भत्ता वाढणार आहे.

सदरील वाढ जुलैपासूनच लागू असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. अशाप्रकारे त्यांना थकबाकी म्हणून 3 हजार 600 रुपयेही मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!