DA Hike : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.मित्रांनो, आपल्याला माहिती असेल नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के ची वाढ केली होती.
आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.आता आणखी एकदा सरकारने कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.
6Th Pay Commission DA Hike
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या बरेच असे कर्मचारी आहे की ज्यांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असते. अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ सरकारने केलेली नव्हती.आता अशा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तर बघूया किती आणि कशी मिळणार ? महागाई भत्ता वाढ ….
सार्वजनिक उपक्रम विभागाने निवेदन जारी केले असूनसहाव्या वेतन आयोगानुसार, पगारदार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सध्याच्या २३९ टक्क्यांवरुन २४६ % करण्यात आली आहे. सदरील वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. थोडक्यात सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात ७ % वाढ करण्यात आली आहे.
उदाहरणार्थ – जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४३,००० रुपये आहे तर त्यात २३९ % महागाई भत्त्यानुसार १,०२,७७० रुपये मिळत असे. आता ७ % वाडीमुळे हा पगार १,०५,७८० रुपये होईल. म्हणजेच तुमच्या पगारात दरमहा थेट ३ हजार रुपयांनी वाढ होणार आहे.
5Th Pay Commission
पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सध्याच्या ४३३ टक्क्यांवरुन ४५५ % करण्यात आला आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात थेट १२ % वाढ करण्यात आली आहे. सदरील वाढ १ जुलै २०२४ पासून लागू झाली आहे.