Close Visit Mhshetkari

Election Duty : विधानसभा निवडणुक २०२४ कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेश रद्द करणेबाबत अनुसरायची कार्यपद्धती …

Election Duty : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ चे अनुषंगाने सर्व विधानसभा मतदारसंघानी त्यांचे कार्यकक्षेतील विविध आस्थापनांकडील अधिकारी/कर्मचारी यांची माहिती NIC मार्फत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात भरली आहे. 

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेचच मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे अधिकारी/कर्मचारी यांचे आदेश सर्व विधानसभा मतदार संघ यांना विधानसभा निहाय बजावण्यासाठी देण्यात येतात. 

सदरचे आदेश संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना प्राप्त होताच विविध कारणांस्तव मोठ्या संख्येने संबंधित अधिकारी/कर्मचारी आदेश रद्द करणेसाठी संबंधित विधानसभा कार्यालयाकडे संपर्क साधतात व लेखी अर्ज करतात. तसेच अनेक वेळा आदेश रद्द करणेकामी विधानसभा मतदारसंघाकडून कर्मचारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सदर करणेकामी पाठवले जाते.

मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेश रद्द कसा करावा?

१. संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशी शिवाय या कार्यालयाकडून कोणतेही आदेश रद्द केले जाणार नाही. त्यामुळे सदर प्रस्ताव आपले कार्यालयाकडून शिफारशीसह पाठविण्यात यावेत. कोणत्याही कर्मचायास याकार्यालयाकडे नियुक्ती आदेश रद्द करणेकामी पाठविण्यात येऊ नये. 

२. मतदान केंद्रावरील शिपाई यांचे नियुक्ती आदेश आपले स्तरावर काढण्यात यावे व त्यांचे प्रशिक्षण आवश्यकतेनुसार घेण्यात यावे.

३. सर्व विधानसभा मतदार संघांकडे निवडणुकीकामी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काही महिला कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे, त्यामुळे आदेश चुकीचे निघालेले आहेत असे समजून सदर आदेश रद्द करणेकामी प्रस्ताव पाठविण्यात येऊ नयेत. ४. मतदार संख्या वाढीमुळे काही मतदान केंद्रावर अतिरिक्त कर्मचार्याची नियुक्ती करावी लागेल. 

हे पण वाचा ~  School Holiday : मोठी बातमी ... राज्यातील शाळांना तब्बल ३ दिवस सुट्टी ? आयुक्त तसेच उपसचिवांकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ...

सदरील कर्मचार्याची नियुक्ती राखीव मधून आपले स्तरावर करण्यात यावी. या कार्यालयाकडे कोणताही राखीव / अतिरिक्त कर्मचारी वर्ग नाही.त्यामुळे केंद्रावरील नियुक्त कर्मबारी आदेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

Election Duty Cancellation Process

सदरचे अर्ज रद्द करणेसाठी विधानसभा मतदार संघामार्फतच जिल्हाधिकारी कार्यालय, NIC कार्यालय, ५ वा मजला, येथील संबंधित विधान सभेकडील समन्वयक संगणक ऑपरेटर यांचेकडे रोजचे रोज सायंकाळी ५.०० पर्यंत खासदुतामार्फत पाठवावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अथवा NIC कार्यालयाकडील कोणत्याही ई-मेलवर अथवा दुरध्वनीवरून अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांव्दारे पाठविण्यात आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही, ही बाब संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना अवगत करून द्यावी.

रहद्द करणेसाठी येणारे अर्ज प्रत्येक विधानसभा मतदार संघ यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ठ प्रमाणे तपासून त्यावर आदेश रद्द करणेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट शिफारस करूनच जिल्हाधिकारी कार्यालय (NIC) येथे खासदुतामार्फत रद्द करणेसाठी पाठवावे. अपुर्ण शिफारस, अपूर्ण कागदपत्रे जोडलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!