Close Visit Mhshetkari

EPFO Pention : EPFO देते फक्त 1 नाही तर 7 प्रकारच्या पेन्शनचा फायदा, आपल्याला निवृत्तीपूर्वीच मिळतात एवढे फायदे, जाणून घ्या तपशील

EPFO Pention : भविष्य निर्वाह निधी (PF) ही नोकरदार लोकांसाठी एक सुरक्षित गुंतवणूक आहे.ज्यामध्ये पगाराच्या 12% रक्कम जमा केली जाते. पेन्शन बरोबरच सेवानिवृत्ती विधवा अमोल अपंगत्व इत्यादी कारणाने कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रदान करते. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये स्थलांतर देखील शक्य आहे.

भविष्य निर्वाह निधी (PF) हा सरकारी नोकरदाराबरोबरच खाजगी नोकरदारांसाठी एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे सदरील योजना संघटित पद्धतीने बचत करण्याची संधी देत नाही तर सुरक्षित भविष्याची सुद्धा हमी देते.

पीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी ?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कंपनीमध्ये काम करणाऱ्या खाजगी नोकरदाराच्या 12% रक्कम सरकार त्याच्या पीएम खात्यात जमा करते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची सुद्धा पीएफ खात्यात जमा होत असते यामुळे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात मोठी रक्कम सेवांवरचे वेळी जमा होत असते सरकार जमा रकमेवरती जवळपास 8 % दराने व्यास सुद्धा देत असते.

कर्मचाऱ्याचे त्याच्या एकूण रकमेच्या योगदानापैकी 8.33% पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केले जातात , तर उर्वरित 3.67 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा केले जातात.अशा प्रकारे, ही एक संरचित बचत योजना आहे जी भविष्यात आर्थिक सुरक्षा प्रदान करते.

सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन: हे सामान्य निवृत्ती वेतन पीएफ खातेधारकाला निवृत्तीनंतर दिले जाते.

अपंगत्व निवृत्ती वेतन : पीएफ खातेधारक सेवेदरम्यान अपघातामुळे अक्षम झाल्यास त्याला अपंगत्व निवृत्ती वेतन मिळते. 

हे पण वाचा ~  PF Claim : मोठी बातमी ... आता अवघ्या 3 दिवसांत PF मधून काढा 1 लाख! काय आहे नियम? या सोप्या प्रक्रियेने काढा पैसे ...

पालक पेन्शन : पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना पेन्शन मिळते. आधी वडिलांना हे पेन्शन मिळत असते व त्यांच्या मृत्यूनंतर आईला हे पेन्शन मिळते.

लवकर पेन्शन : वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतर, जर पीएफ खातेधारक नॉन-ईपीएफ कंपनीशी संबंधित असेल, तर त्याला लवकर पेन्शन मिळू शकते. परंतु यामध्ये मिळणारे पेन्शन हे सामान्य पेन्शनपेक्षा 4 टक्के कमी आहे.

विधवा किंवा अपत्य निवृत्तीवेतन : पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर, मुलाचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्याच्या पत्नी व मुलांना पेन्शन मिळते.

नॉमिनी पेन्शन : जर पीएफ खातेधारकाने ईपीएफओ पोर्टलवर ई-नॉमिनेशन फॉर्म भरला आणि त्याचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला पेन्शन मिळण्याचा अधिकार असतो.

अनाथ पेन्शन : पीएफ खातेदार आणि त्याची पत्नी या दोघांच्याही मृत्यूनंतर, त्यांची मुले पेन्शनसाठी पात्र असतात, जर मुलांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसेल.

How To Withdraw EPF Money

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी पीएफ निधी काढता येतो व दरमहा पेन्शन म्हणून त्यांना ते मिळू शकते. आपत्कालीन काळातही कर्मचारी निवृत्ती पूर्वी पीएफ फंडातील काही पैसे काढू शकतात.

भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असतो व त्याच्या कुटुंबियांची आर्थिक सुरक्षितता यामधून ते निश्चित करत असतात. ही योजना विविध पेन्शन सुविधा द्वारे कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्माननीय जीवन जगण्यास उपयुक्त ठरते.

Leave a Comment

error: Content is protected !!