Close Visit Mhshetkari

FD Interest Rate : मोठी बातमी.. आता ‘या’ बँका एफडीवर देत आहेत 9 % व्याजदर; पहा संपूर्ण यादी …

FD Interest Rate : नमस्कार मित्रांनो आपल्याला सध्या माहिती असेल की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या बचतीवर चांगला परतावा देण्यासाठी आरबीआय कडून वेळोवेळी बदल करण्यात येतो.

सध्या रिझर्व बँक ऑफ इंडिया चा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. अशा परिस्थितीत सुद्धा काही बँका फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहेत.

Fixed Deposit Interest Rate 2024

मित्रांनो, ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँके RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर काही बँकांनी त्यांच्या मुदत ठेवी (FD) व्याजदर वाढ केली आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा यासाठी भारतात बरेच लोक विशेष म्हणजे पेन्शनवर बँकेच्या बचत ठेवीमध्ये गुंतवणूक करत असतात.आज आपण अशा महत्त्वाच्या बँकांच्या व्याजदराबद्दल माहिती बघणार आहोत, ज्या 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.

Bank FD Interest Rate

1) युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 7.85 टक्के ते 9 टक्के व्याजदर मिळत आहे.

हे पण वाचा ~  Bank FD : बँक एफडी नवीन व्याजदर जाहीर! पहा कोणती बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर ?

2) नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणूकसाठी 6.25 टक्के ते 9.00 टक्के व्याजदर मिळत आहे.

4) सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6.85 टक्के ते 8.65 टक्के व्याजदर मिळत आहे.

5) उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.75 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर मिळत आहे.

6) इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणूक कालावधीसाठी 7.25 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर मिळत आहे.

7) एयू स्मॉल फायनान्स बँकेतील व्याजदर पहायचे झाल्यास 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.25 टक्के ते 8.00 टक्क्यांपर्यंत आहेत.

मित्रांनो हे होते सध्या चालू असलेले बचत ठेवीवरील व्याजदर आपल्याला सुद्धा फिक्स डिपॉझिट करायचं असेल, तर आपण तत्पूर्वी संबंधित बँकातील ठेवीवरील व्याजदरांविषयी खात्री करावी.वेगवेगळ्या बँकेत चौकशी केल्यानंतर आपण गुंतवणुकीचा विचार करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!