Festival Advance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये आगाऊ स्वरूपात अग्रिम मिळत असते,त्यालाच सण अग्रीम किंवा “Festival Advance” असे म्हणतात.
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सर्वसाधारणपणे सनासुदीला 12 हजार रुपयांपर्यंत सण अग्रिम देण्यात येते,जे पुढील 10 महिन्यात पगारातून दरमहा समान हप्त्यात वसूल करण्यात येते.
Festival Advance Application
सण अग्रिम खालील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय असते.
सण अग्रीम pdf अर्ज येथे डाऊनलोड करा ➡️ Festival Advance
सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी प्रमाणे विहित केल्याप्रमाणे असतील.
१. दिवाळी
२. रमझान ईद
३. ख्रिसमस
४. पारसी नववर्ष
५. संवत्सरी
६. रोश-होशना
७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
८. स्वातंत्र्य दिन
९. प्रजासत्ताक दिन
१०.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की; मागील वर्षी बऱ्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांना सण कर्ज देण्यात आली नव्हती किंवा मिळाले नाही. आता यावर्षी कर्मचाऱ्यांकडून सण कर्जासाठी अर्ज मागविण्यात आले असून, आता दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांना सण आगरी मिळते का ? याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिल आहे.