Close Visit Mhshetkari

Free Ration : खुशखबर … गौरी – गणपती सणानिमित्त मिळणार आनंदाचा शिधा ! पहा लाभार्थी पात्रता सविस्तर माहिती .

Free Ration : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,२०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.

Free Ration for Gouri Ganpati Festival

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (APL) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी सन २०२४ मधील गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो परिमाणात साखर,चणाडाळ, रवा व १ लिटर सोयाबीन तेल या परिमाणात ४ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबस निर्णय घेतला आहे.

अंत्योदय अन्न योजना – आनंदाचा शिधा

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो परिमाणात साखर, चणाडाळ, रवा व १ लिटर सोयाबीन तेल (९००-९१० ग्रॅम) या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला १ शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच ₹१००/- या दराने वितरीत करावेत.

जिल्हानिहाय पुरवठा करावयाच्या शिधाजिन्नस संचांच्या संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेले आहे. सदर संख्येच्या मर्यादेत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामांपर्यंत विहित मुदतीत पोहोचवावेत.

गोदामात येणारी शिधाजिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे शिधाजिन्नस यांची नोंद online पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार ABPDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी.

शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस खराब न होण्याची / खाण्यास अयोग्य होण्याची मुदत (expiry date) साखर,चना डाळ,खाद्यतेल याकरीता कमीतकमी ४ महिन्यांची असल्याची व रवा याकरीता कमीतकमी ३ महिन्यांची असल्याची खात्री करूनच पुरवठादाराकडून शिधाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत.

शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याचे NABL अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराच्या प्रतिनिधीने संबंधित गोदामपाल यांच्याकडे सुपूर्द करावा. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्नस / शिधाजिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत,याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याचे NABL अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराच्या प्रतिनिधीने संबंधित गोदामपाल यांच्याकडे सुपूर्द करावा. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्नस / शिधाजिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मोफत रेशन वाटप योजना

पुरवठादाराकडून तालुका गोदामात शिधाजिन्नस संच प्राप्त झाल्यावर, जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी स्वतःअथवा तहसिलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून शिधाजिन्नस संचाची पुरवठादाराच्या प्रतिनिधीसमोर यादृच्छिकपणे (randomly) नमुने गोळा करावेत.

सदर नमुन्यांची NABL अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी. सदर तपासणीअंती नमुना विहित निकषांची पुर्तता करीत नसल्याचे आढळल्यास, पुरवठादारास तात्काळ अवगत करून संबंधित शिधाजिन्नस संचाचा साठा (Lot) बदलून घेण्याबाबत कार्यवाहीकरावी.

सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी सुट्टीच्या दिवशी गोदाम चालू ठेवण्याबाबतच्या संबंधीतांना सुचना देण्यात याव्यात.सदर शिधाजिन्नस संच प्रति संच ११००/- या दराने वितरीत करावयाचे आहेत.सदर विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम रास्तभाव दुकानदारांनी मार्जिन वजा करुन उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांच्याकडे शिधाजिन्नस संचांच्या वितरणानंतर ७ दिवसांत जमा करावी.

सदर शिधाजिन्नस संचांची विक्री करण्याकरिता संदर्भाधीन दिनांक ४ सप्टेंबर,२०१७ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देय राहील. तसेच शिधाजिन्नस संच वितरणाचा कालावधी विचारात घेता, एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण शिधाजिन्नस संचांचे वितरण करण्याबाबत रास्तभाव दुकानदारांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करावयाच्या शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” योजनेचा लाभ सुनिश्चित करण्याकरीता, या योजनेबाबतची जनजागृती करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी करावी.

जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता प्राप्त व वितरीत होणाऱ्या शिधाजिन्नस संचांची माहिती शासनास वेळोवेळी उपलब्ध करुन द्यावी व त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

प्रस्तुत शिधाजिन्नस संचांच्या खरेदीसाठी स्मार्ट सव्हीसेस प्रा.लि.यांच्याशी करारनामा करण्याची कार्यवाही वित्तीय सल्लागार व उपसचिव यांनी करावी.स्मार्ट सर्व्हसेस प्रा. लि. यांनी शासनास पुढील मुद्द्याबाबतची माहिती दररोज napu२२.mhpds@mah.gov.in या ई-मेल वर तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सादर करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!