Hdfc Credit Card: आपल्याला माहितीच आहे. की आता जुलै महिना संपला असून आणि 1 ऑगस्ट पासून होणारे बदल आणि या बदलांमध्ये होणाऱ्या आर्थिक घडामोडी याविषयी या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. जर मित्रांनो तुमच्याकडे एचडीएफसी ची क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1ऑगस्ट 2024 पासून आर्थिक बदल आपल्याला होताना दिसत आहे.
एचडीएफसी बँक ही महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्रेडिट कार्ड संबंधित काही नियम बदलणार आहेत. ज्यामुळे तुमचा खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे.
HDFC Bank Credit Card Rules
1पेमेंटवर 1% अतिरिक्त शुल्क
मित्रांनो 1 ऑगस्ट 2024 पासून देशांमध्ये लागू होणाऱ्या प्रमुख बदलापैकी एक अर्थव्यताशी संबंधित आहे याचा परिणाम एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. बँक आता पेमेंट ॲप द्वारे केलेल्या सर्व भाडे व्यवहारावर क्रेडिट कार्ड वापर करताना एक टक्के अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. हा नियम PayTM, CRED, MobiKwik व इतर तृतीय पक्ष ॲप्स वापरून एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर लागू होईल. बँकेने प्रति व्यवहाराची कमाल मर्यादा 3000 रुपये ठेवली आहे.
2 युटिलिटी व्यवहारावर शुल्क
इंडिया टुडे च्या अहवालानुसार युटीलिटी व्यवहारावर येथे शुल्क आकारले जात आहे. तथापि 50 हजार रुपये पेक्षा कमी व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून परंतु अशा पेमेंट मुळे मूल्य 50 हजार रुपये पेक्षा जास्त असल्यास तर एक टक्के दराने त्यावर शुल्क आकारण्यात येईल. व प्रति व्यवहार मर्यादा 3000 रुपये असणार आहे.
3 इंधन शुल्क
पेट्रोल व डिझेलवर शुल्कातून सूट विमा पेमेंट इंधन व्यवहाराबाबत लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार कार्डधारकाने 15000 पेक्षा कमी पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क करणे जाणार नाही. परंतु यापेक्षा व्यवहारांमध्ये जास्त शुल्काचा वापर कार्डद्वारे केल्यास 1 टक्के शुल्क ग्राहकाला भरावे लागणार आहे. तसेच विमा पेमेंट वरही कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
4शैक्षणिक पेमेंटमध्ये नवा नियम
तृतीय पक्ष ऍप द्वारे केलेल्या कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक पेमेंट वर 1 टक्का दराने शुल्क आकारले जाईल तसेच शैक्षणिक संस्थांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे व pos या मशीनद्वारे केलेल्या थेट पेमेंट वर असे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही शिवाय आंतरराष्ट्रीय शैक्षणिकतेयकांनाही या शुल्कातून सूट देण्यात आली आहे