Income Tax News : नमस्कार मित्रांनो, आयकर दात्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून, आता आयटीआय रिटर्न भरण्यासाठी फायलिंगच्या बॉटलमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, विभागाच्या अंतर्गत परिपत्रकात नवीन आयटीआर e-filing Portal IEC 3.0 लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Income Tax New update
सदरील नवीन प्रणालीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाले असेल परिपत्रकानुसार विद्यमान इंटिग्रेटेड ई-फाइलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (IEC) 2.0 चा ऑपरेशन फेज संपणार आहे. त्याचबरोबर IEC 3.0 हा नवीन प्रकल्प त्याची जागा घेईल.
काय आहे IEC प्रोजेक्ट?
आयईसी प्रोजेक्टमध्ये ई-फायलिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. त्या प्रणालीमुळे करतात त्यांना आपल्या आयटीआय फायलिंग साठी मदत होणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म भरणे जमा करणे आणि अनेक सेवांचा वापर करणे शक्य होणार आहे.
आयईसी प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC). ई-फायलिंग पोर्टल आणि आयटीबीएच्या मदतीनं भरलेल्या आयटीआरवर प्रक्रिया करण्याची जबाबदारी घेतली जाते.
सोबतच आयईसी बॅक-ऑफिस (BO) पोर्टल देखील प्रदान करते. याद्वारे क्षेत्रीय अधिकारी करदात्यांच्याफाइलिंग आणि प्रोसेसिंग डेटा एक्सेस करू शकतात.
ITR e-filing Portal IEC
परिपत्रकात म्हटल्यानुसार प्रोजेक्ट ICE 2.0 चे उद्दीष्ट केवळ प्रोजेक्ट आयईसी 2.0 द्वारे प्रदान केलेल्या सेवा सुरू ठेवण्याचे नाही. त्याऐवजी लक्षणीय चांगली व्यवस्था उभी करणे हेदेखील आहे.
नवीन प्रणाली ITR प्रक्रियेस गती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, ज्यामुळे करदात्यांना त्वरित परतावा मिळण्यास मदत होणार आहे.