Close Visit Mhshetkari

ITR Filling : आयटीआर फाईल करून सुद्धा आपला रिफंड परत मिळाला नाही ? कसा करा ऑनलाईन संपर्क..

ITR Filling : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आयटीआय भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती आणि आता ही तारीख संपलेली आहे. बहुतांश आयकरता त्यांनी आपला आयटीआय फाईल केलेला आहे जर 31 जुलै पर्यंत आपण आयटीआय भरला नाही तर आपल्याला दंड भरावा लागतो.

आयटीआर भरण्याची शेवटची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.पण प्राप्तिकर विभागाने ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. बरेच जणांनी आयटीआय फाईल केलेला असून रिफंड मात्र अद्याप पर्यंत मिळालेला नाही. आयटीआय रिटर्न भरल्यानंतर रिफंड कसा मिळवायचा ? त्याची ऑनलाईन तक्रार कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

ITR Return Status online

मित्रांनो आपण यापूर्वीच बघितली होती की आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडी वरून आपण ई-फायलिंग द्वारे पोर्टल वरती आयकर सूचना तपासू शकता. ज्यामध्ये तुमचे बँक खाते आणि बँक स्टेटमेंट रिफंड द्वारे पूर्ण झाली का नाही याची माहिती पाहता येते.

कर दात्याला रिपोर्टची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम आयकर विभागाच्या पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.त्यानंतर माय अकाउंट मधील रिफंड सेक्शन वरती आपण रिटर्न चे वर्ष निवडून स्टेटस पाहू शकतो.

हे पण वाचा ~  Income Tax News : आयकरदात्यांसाठी आनंदाची बातमी; आता काही मिनिटांत पूर्ण होणार ITR फाईल! रिफंड पण मिळणार लगेच ...

सध्या आपल्याला माहिती आहे की, परताव्याच्या विलंबाची समस्या भेडसावत आहे. सर्वप्रथम आपला नोंदणीकृत ईमेल तपासा की, तुम्हाला विभागाकडून परताव्याची सूचना किंवा इतर कोणतीही माहिती मिळाली आहे का ? आपला रिफंड स्थितीत आढळलेला नाकारला गेल्यास, तुम्ही परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती पाठवू शकता.

Income Tax ITR Filling Portal

सध्या आयकर विभागातर्फे रिफंड नाकारल्या च्या समस्यांचा सामना बऱ्याच करदात्यांना करावा लागत आपला सुद्धा रिफंड नाकारला गेला असल्यास आपण पुन्हा क्लेम करू शकता यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टल वरती www.incometax.gov.in लॉग इन करा आणि परतावा पुन्हा जारी करण्याच्या पर्यायावर जाऊन पुढे जाऊ शकता.

शेवटी हे करून सुद्धा आपल्याला आयकर रिटर्न येण्यास समस्या निर्माण होत असेल, तर आपण आयकर विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक वर किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता. या ठिकाणी मित्रांनो आयकर संदर्भात विविध समस्यांची सुद्धा सूचना आपण इन्कम टॅक्स विभागाला देऊ शकतो.

  • हेल्पलाइन – 1800-103-4455
  • ईमेल – ask@incometax.gov.in

Leave a Comment

error: Content is protected !!