Close Visit Mhshetkari

ITR Refund Status : आपल्या इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस कसे पहायचे ? रिटर्न कसा मिळवचा ? समजून घेऊया सोपी पध्दत…

ITR Refund Status : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ जवळ संपत आलेली बऱ्याच आयकर धारकांनी आपला ITR भरलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे.

मित्रांनो मदतीच्या आत आयकर व्यवहार पत्र भरल्यानंतर करड्या त्यांना ते व्हेरिफिकेशन करावे याशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही.

Income Tax Return Status

आपल्याला माहिती असेल की वर्षभर कर्मचाऱ्यांच्या पगारातून आयकर कापला आर्थिक वर्ष समाप्तीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरून ई व्हेरिफिकेशन (e-verification) केल्यानंतर अतिरिक्त कापला गेलेला प्राप्तिकर करदात्याच्या खात्यात जमा होतो. यालाच इन्कम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) असे म्हणतात.

आपण TDS किंवा TCS किंवा अॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या स्वरूपात कापल्या गेलेल्या अतिरिक्त रकमेचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आयकर विभाग शिल्लक रक्कम आयकर भरणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन वर्ग करते.

आयकर विभागाने त्यांच्या पोर्टलवर रिफंड संदर्भातील माहिती दिली आहे.साधारणपणे करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर त्याच्या बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होण्यास 4-5 आठवड्यांचा कालावधी लागतो.

ITR Refund Status Check Process 

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना तुम्ही दिलेल्या ई-मेलवर प्राप्तिकर विभागाकडून रिफंडसंदर्भात काही सूचना किंवा नोटिफिकेशन तर आलं नाही हे तपासून घ्या.

हे पण वाचा ~  Income Tax News : आयकरदात्यांसाठी आनंदाची बातमी; आता काही मिनिटांत पूर्ण होणार ITR फाईल! रिफंड पण मिळणार लगेच ...

त्याशिवाय इ-फायलिंग पोर्टलवर (eFiling Portal) देखील करदाते त्यांच्या Refund Status तपासू शकतात.

इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर रिफंड स्टेटस तपासण्यासाठी योग्य युजर आयडी, पासवर्ड,आधार कार्डला लिंक्ड केलेला पॅन नंबर या गोष्टी आवश्यक आहेत.

  • सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या E – filling पोर्टलवर जाऊन लॉगिन वर क्लिक करा.
  • आता आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • युजर आयडी म्हणून पॅन नंबर किंवा आधार नंबरचा वापर करता येतो.
  • जर आपला आधार आणि पॅन नंबर लिंक नसेल तर पॅन नंबरचा वापर करून लॉगिन करता येत नाही.
  • आता पॅन नंबर आधारशी लिंक करण्यासाठी लिंक नाऊ (Link Now) बटणावर क्लिक करा.
  • पॅन नंबर आधार नंबरशी लिंक झाला असेल तर तुम्हाला तो पुन्हा लिंक करण्याची आवश्यकता नाही.
  • आता ‘Continue’ वर क्लिक करून पुढे जा.
  • शेवटी ‘Sevrvices’ टॅबवर ‘Know Your Refund Status’ वर क्लिक करा.
  • आपल्याला ज्या वर्षाच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या रिफंडचे स्टेटस तपासायचे आहे ते वर्ष सिलेक्ट करून आपण आपला रिफंड तपासू शकता.

आपला ITR Refund Status येथे चेक करा 👉 ITR Status

टीप : 31 मार्च 2023 आधीचे किंवा या दिवसाचे रिफंड स्टेटस तपासायचे असल्यास NSDL च्या वेबसाईटवर पाहता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!