LIC Policy Rules : तुम्ही जर एलआयसी ची नवीन पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. एलआयसी ची नवीन पॉलिसी खरेदी करण्याअगोदर एलआयसी चे बदललेले नियम माहिती असणे आवश्यक आहे. या बदलामुळे बुद्ध लोकांवर जास्त परिणाम होणार आहे.
LIC Policy New Rules
सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारामध्ये विविध पॉलिसी देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु अजूनही लोकांच्या मनात एलआयसी ही पहिल्या क्रमांकावर आहे. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीने अलीकडे केलेल्या नवीन बदलाची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.
या बदलांनुसार, एलआयसीने आपल्या नवीन एंडॉवमेंट प्लॅनमध्ये प्रवेशाचे वय ५५ वर्षांवरून ५० वर्षे केले आहे. हा निर्णय वृद्धांसाठी तोट्याचा ठरू शकतो. कारण आता ते ५० वर्षांनंतर या योजनेत प्रवेश करू शकणार नाहीत. याशिवाय, प्रीमियम दरांमध्येही सुमारे १०% वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे पॉलिसीधारकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढणार आहे.
या नियमामुळे काय होणार परिणाम
या बदलानुसार तुम्हाला एलआयसी ने आपल्या नवीन एंडॉवमेंट प्लॅनमध्ये प्रवेशाचे वय 55 वर्षांवरून 50 वर्ष केले आहे हा निर्णय वृद्ध लोकांसाठी तोट्याचा असणार आहे कारण आता ते पन्नास वर्षानंतर या योजनेत प्रवेश करू शकणार नाही. तसेच प्रीमियम दरामध्ये सुमारे 10% टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे पॉलिसीधारकावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढणार आहे.
हा नियम एलआयसी ने 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू केला आहे विमा उद्योगातील तज्ज्ञांचे असे म्हणणे येते की कंपनीने हे पाऊल आपली जोखीम कमी करण्या च्या उद्देशाने उचलले असून मात्र या वयानंतर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे एलआयसीचा नवीन एंडॉवमेंट प्लॅन 914 केवळ संरक्षण कवच प्रदान करत नाही. तर ती एक बचत योजना म्हणून ओळखली जाते. तुम्हाला यामध्ये मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेमेंट केले जाते. तर पॉलिसीधारकाला पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर परिपक्वता लाभ मिळतो.
एलआयसीच्या या योजना मध्ये होणार बदल
तर एलआयसीच्या सहा योजना एलआयसी कडे एकूण सहा एंडॉवमेंट योजना हे जात सिंगल प्रीमियम, ऍडव्हानमेंट प्लान ,नवीन जीवन आनंद, जीवन लक्ष, जीवन लाभ ,व अमृत बाल यासारख्या लोकप्रिय योजनांचा समावेश आहे.
1 ऑक्टोबर पासून या सर्व प्लॅनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे.यासोबतच एलआयसी ने आपल्या सरेंडर व्हॅल्यू नियमांमध्ये देखील बदल केले आहे तर हे नवीन नियम व बदल सुमारे 32 विमा उत्पादनांना लागू होणार आहे व नवीन नियमानुसार काही पॉलिसीधारकांना योजनेतून बाहेर पडल्यावर मिळणाऱ्या रकमेत कपात होऊ शकते.
तर मित्रांनो एलआयसी ने आपल्या नवीन जीवन आनंद व जीवन लक्ष योजना मध्ये विम्याची रक्कम एक लाख वरून दोन लाख रुपये केली आहे. खाजगी कंपन्यांनी त्यात एडवमेंट योजना मध्ये केवळ 6- 7 % टक्के वाढ केली आहे. यामुळे त्याची प्रीमियम दर तुलनेने कमी आहे. एलआयसीच्या या बदलाबाबत कंपनीने अद्याप देखील कोणतेही अधिकृत विधान दिले नाही. हे बदल वृद्ध लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण ते त्याच्या विमा संरक्षणावर परिणाम करू शकतात.