Mutual Fund : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की शेअर बाजार म्हणजेच निफ्टी आणि सेन्सेक्स ने एक ऑगस्ट 2024 रोजी नवीन विक्रम घातला आहे.निफ्टीने 25000 चा टप्पा पार केला असून सेन्सेक्स ने 82000 स्तर घातलेला आहे.यासाठी निफ्टी ला 29 वर्ष कालावधी लागला.मित्रांनो निफ्टीचा चक्रवाढ वार्षिक परतावा जर बघितला तर साधारणपणे 13.4 टक्क्यांनी यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे.
आता या कालावधीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा मोठा लाभ झालेला आहे.तर आपण मागील काही काळामध्ये जबरदस्त परतावा देणाऱ्या 10 म्युच्युअल फंडाची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
Tops Mutual fund 2024
Paraag Parekh flexi cap mutual fund
पराग पारिख फ्लेक्सी म्युच्युअल फंड 28 मे 2013 रोजी झाला होता मित्रांनो हा फ्लेक्झि कॅप म्युच्युअल फंड असून कमी आणि जास्त बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य आहे.
सदरील म्युच्युअल फंडाचा पाच वर्षाचा विचार करायचा झाला तर 26 टक्के रिटर्न दिला असून दहा वर्षाच्या गुंतवणूक नंतर 18.4% CAGR परतावा दिला आहे. आपण जर 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक sip सुरू केली असती,तर आज आपले 35.6 लाख रुपये झाले असते.
HDFC midcap opportunity fund
एचडीएफसी मिडकॅप ऑपर्च्युनिटीज फंड 25 जून 2007 रोजी सुरू झाला होता. मित्रांनो हा मिडकॅप फंड आहे. म्हणजेच यामध्ये मिडकॅप कंपन्या आपले शेअर्स गुंतवणूक करतात खंडाचा पाच वर्षाचा आणि दहा वर्षाचा कालावधी बघायचा झाल्यास मागील पाच वर्षात 37.60% तर दहा वर्षाचा विचार करायचा झाल्यास 20.07 टक्के CAGR परतावा दिला आहे.
ICICI prudential mutual fund
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड हा फंड 23 मे 2008 रोजी सुरू करण्यात आला होता. लार्जकॅप फंड असून कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. सदरील म्युचल फंडणे मागील पाच वर्षात 21.6% तर मागील 10 वर्षाचा विचार करायचा झाल्यास 15.5 टक्के CAGR परतावा दिला आहे.आपण जर 10 वर्षांपूर्वी या योजनेत 10 हजार रुपयांची मासिक sip सुरू केली असती तर आपले 30.5 लाख रुपये झाले असते.
HDFC flexi cap fund
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड 1 जानेवारी 1995 रोजी सुरू करण्यात आला होता. मित्रांनो हा फ्लेक्सिकॅप फंड आहे. फंडाचा 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 23.5 % आणि 16.1 % आहे. आपण जर दहा वर्षांपूर्वी 10 हजार रुपये मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज आपल्याला 33.7 लाख रुपये मिळाले असते.
Nippon India small cap fund
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड 16 सप्टेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आला होता. सदरील फंड हा स्मॉलकॅप असून गुंतवणूक फक्त स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते.
या म्युच्युअल फंडाचा पाच वर्षाचा आणि दहा वर्षाचा विचार करायचा झाल्यास अनुक्रमे 38.1% आणि 25. 3% परतावा दिलेला आहे. आपण जर 10 वर्षांपूर्वी या योजनेत 10 हजार रुपयांची मासिक sip सुरू केली असती तर आपले 51.2 लाख रुपये झाले असते.
Maria assist large cap Fund
मिरे ॲसेट लार्ज कॅप फंड 4 एप्रिल 2008 रोजी सुरू करण्यात आला होता. सदरील लार्जकॅप फंड आहे. याचा अर्थ फंड फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. फंडाचा 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 17.6 टक्के आणि 15.3 टक्के आहे. तुम्ही 10 वर्षांपूर्वी या योजनेत 10,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असती तर आज तुमचे पैसे 27 लाख रुपयांपर्यंत वाढले असते.
SBI bluechip mutual fund
एसबीआय ब्लूचिप फंड 20 जानेवारी 2006 रोजी सुरू झाला होता. मित्रांनो,सदरील फंडाचा 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 18.9% आणि 14.8 % आहे. आपण जर दहा वर्षांपूर्वी सदरील म्युच्युअल फंडाच्या sip मध्ये गुंतवणूक केली असते तर आपल्याला 27. 1 लक्ष रुपये परतावा मिळाला असता.
Kotak Emerging Equity fund
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड 30 मार्च 2007 रोजी सुरू करण्यात आला होता. पाच वर्षाच्या गुंतवणुकीचा विचार करायचा झाल्यास या फंडामध्ये आपण 29.60% परतावा पाहू शकतो आणि दहा वर्षाचा पडदा विचार करायचा झाल्यास 21.5% परतावा मिळालेला आहे दहा वर्षांपूर्वी आपण दहा हजार रुपयाची एसआयपी काढले असती तर आज आपल्याला 39 लाख रुपये परतावा मिळाला असता.
Kotak flexi cap mutual fund
कोटक फेक्सिकॅप फंड 23 मे 2008 रोजी सुरू करण्यात आला होता. सदरील म्युच्युअल फंड हार लाडकापासून यामध्ये मोठ्या कंपन्या गुंतवणूक करतात पाच वर्षांनी दहा वर्षाचा परताव्याचा विचार करायचा झालास अनुक्रमे 21.6 आणि 15.5% परतावा मिळालेला आहे दहा वर्ष पूर्वी गुंतवणूक केली असती तर आपल्याला दहा लाख रुपयांच्या मासिक एसआयपी द्वारे आज 30.5 लाख रुपये परतावा मिळाला असता.