Close Visit Mhshetkari

MXC Gold Price : खुशखबर … दिवाळी नंतर सोने-चांदीचे दर घसरले; पहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

MXC Gold Price : नमस्कार मित्रांनो, राज्यात सर्वाधिक सोने-चांदीची विक्री दिवाळीच्या मुहूर्तावर होत असते. यावर्षी दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीचे दर चांगलेच वाढलेले दिसले. 

ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने व नाण्यांची खरेदी केली आहे.लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.सोने-चांदीच्या दराबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

MXC Gold Market Live

धनत्रयोदशी म्हणजेच मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०२४ बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर खालील प्रमाणे होते.

  • २४ कॅरेटसाठी ७९ हजार २०० रुपये
  • २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये
  • १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये
  • १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम खालील प्रमाणे होते.

  • २४ कॅरेटसाठी ७९ हजार ४०० रुपये
  • २२ कॅरेटसाठी ७३ हजार ८०० रुपये
  • १८ कॅरेटसाठी ६१ हजार ९०० रुपये
  • १४ कॅरेटसाठी ५१ हजार ६०० रुपये
हे पण वाचा ~  MCX Gold Rate : आनंदाची बातमी ... सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; पहा 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव ....

पाडव्याला म्हणजेच शनिवारी दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपुरात सोन्याचे दर खालील प्रमाणे होते.

  • २४ कॅरेटसाठी ७८ हजार ९०० रुपये
  • २२ कॅरेटसाठी ७३ हजार ४०० रुपये
  • १८ कॅरेटसाठी ६१ हजार ५०० रुपये
  • १४ कॅरेटसाठी ५१ हजार ३०० रुपये

चांदीच्या दरात घसरण

धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोंबरला बुधवारी रोजी नागपुर सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो १ लाख रुपये नोंदवले गेले आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोंबरला प्रति किलो ९८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले होते. 

लक्ष्मीपूजनाच्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये होते.

पाडव्याच्या दिवशी २ नोव्हेंबरला चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार ५०० रुपयांची घट होऊन प्रति किलो ९५ हजार रुपये नोंदवले गेले.

Leave a Comment

error: Content is protected !!