National Pension System : प्रत्येकाच्या मनामध्ये नोकरी करत असताना. सेवानिवृत्तीनंतर काय होणार असा प्रश्न निर्माण होतो? सरकारी नोकरी असेल तर ठीक पण खाजगी नोकरी करत असाल तर सेवानिवृत्तीनंतर किंवा वयाच्या 50 वर्षा नंतर घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न समोर उभा राहतो.
लोक सेवानिवृत्तीनंतर नियोजन करायला लागतात पण त्यासाठी किती पैसे लागतील व पैसे कुठे गुंतवायचे ? कसे गुंतवायचे याचा विचार आतापासून करायला पाहिजे. नाहीतर सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम National Pension System येथे थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी तुम्हाला एक ठराविक मोठी रक्कम मिळेल.
How to open NPS Account
- 18 ते 65 वयोगटातील भारतीय नागरिक राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये eNPS पोर्टलद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन नावनोंदणी करता येते.
- नागरिकांना Know Your Customer डॉक्युमेंट आणि सबस्क्रायबर (सदस्य फॉर्म) सबमिट करणे आवश्यक आहे.
- टियर I (Tier I) हे एक सेवानिवृत्ती खाते . तुम्हाला अकाउंट उघडण्याच्या दरम्यान किमान 500 रुपये भरणे आवश्यक आहे.
- सेवानिवृत्तीपर्यंत किंवा वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्हाला यामधून पैसे काढता येत नाही.
Tier I and Tier II of NPS
- १.NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहे. त्यामध्ये Tier I and Tier II या अकाउंटचा समावेश आहे .
- २. Tier I हे एक सेवानिवृत्ती खाते आहे आणि Tier II एक स्वयंसेवी खाते.
- ३. नागरिक सदस्य इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि पर्यायी गुंतवणूक मध्ये मालमत्ता वाटप करण्यासाठी Active Types निवडा.
- ४. सदस्य Auto Choice निवडू शकतात; ज्याद्वारे वयाच्या आधारावर रकमेचे आपोआप वाटप करण्यात येते.
Income Tax Savings on NPS
- एनपीएसमधील सेक्शन 80CCE कायद्याच्या अंतर्गत वार्षिक 1.5 लाखांपर्यंत tax benefits होतो.
- हे पगारदार आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही सदस्यांना राहतो.
- याव्यतिरिक्त कलम 80CCD(1B) कलमा अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कोणताही कर आकारत नाही.
- एनपीएस योजनेमुळे तुम्हाला एकूण 2 लाख रुपयांच्या करबचतीचा मोठा फायदा राहतो.
How to withdraw moneyfrom NPS
वयाच्या 60 वर्षांपर्यंत किंवा निवृत्त झाल्यावर सदस्य त्यांच्या कॉर्पसच्या 60करमुक्त पैसे तुम्हाला काढता येतात. व उर्वरित 40 टक्के रक्कम पेन्शनवर खरेदी करता येते. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मधून साठ वर्षाच्या आधी बाहेर पडणे व गंभीर आजारासारख्या कारणासाठी पैसे काढून घेणे अधिनियम समाविष्ट करण्यात आले आहे.