Close Visit Mhshetkari

PF Claim : मोठी बातमी … आता अवघ्या 3 दिवसांत PF मधून काढा 1 लाख! काय आहे नियम? या सोप्या प्रक्रियेने काढा पैसे …

PF Claim : EPFO च्या या सुविधेमुळे आता अवघ्या तीन दिवसांत 1 लाखांचा विमा काढता येणार आहे. मित्रांनो सदरील दावा प्रक्रिया करण्यासाठी यापूर्वी सुमारे पंधरा ते वीस दिवस कालावधी लागत असे.

नवीन प्रणालीनुसार आता फक्त तीन ते चार दिवसात सदरील रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे,तर पहा कसा होणार आहे बदल ? सविस्तर माहिती

EPFO Advance Online Claim

भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अनेक अडचणींचा सामना आता कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांना आता वेळेवर पैसे उपलब्ध होणार आहे.

EPFO ने आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसंदर्भात ॲडव्हान्स क्लेमसाठी ऑटो मोड सेटलमेंटची सुविधा सुरू आहे. या सुविधेचा लाभ पीएफ खातेधारकांना होईल.सध्या भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे 6 कोटींहून अधिक खातेदार आहे. आता परिणामी ग्राहकांना जलद पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता तीन ते चार दिवसांत रक्कम

ईपीएफओच्या ॲडव्हान्ससाठी दावा करण्याच्या प्रक्रिया येचा विचार करायचा झाला तर यापूर्वी अतिशय किचकट आणि वेळ खाऊ होती. कमीत कमी 15 ते 20 दिवस कालावधी लागत असेल आता सर्व प्रक्रिया कमीत कमी तीन दिवसात चार दिवसात पूर्ण होईल अशी प्रणाली भविष्य निर्वाह निधी संघटनेने विकसित केली आहे.

अगोदर संघटनेच्या सदस्यांना पात्रता, कागदपत्रे, खात्याची केवायसी स्टेटस, बँक खात्याचे सविस्तर माहिती याची खात्री व तपासणी केल्यानंतर रक्कम वर्ग करावी लागत असे, पण आता ऑटोमेटेड सिस्टीम मध्ये स्कुटी आणि अपरोल म्हणजे पडताळणी आणि मंजुरी मिळणार आहे त्यामुळे दावा सहज पास होईल.

हे पण वाचा ~  EPS 95 Pension : अपुऱ्या पेन्शनचा जनसामान्यांना फटका! निवृत्तीनंतर मिळणार जादा रक्कम ? पहा सरकारचा प्लॅन काय ?

आपत्कालीन निधी केवळ आरोग्य कारणासाठी काढता येत होता त्यासाठी ऑटोमेटेड प्रणालीची सुरुवात एप्रिल 2020 मध्ये करण्यात आली होती आता सेवांचा परिघ वाढवण्यात आला असून आरोग्य शिक्षण लग्न घर खरेदी इत्यादी कारणासाठी EPF चा पैसा काढता येणार आहे.

किती पैसे काढता येईल ?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की,EPFO खात्यातून आगाऊ रक्कम काढता येते. रकमेचा विचार करायचा झाला तर एक लाख रुपये पर्यंतची रक्कम ऍडव्हान्स रुपात करता येणार आहे यापूर्वी सदरील मर्यादा 50 हजार रुपये इतकी होती ही आगावर कम काढण्याचे काम ऑटो सेटलमेंट मोडद्वारे करता येते.

ईपीएफ खात्यातून सदर रक्कम काढण्यासाठी कोणतेही परवानगीची गरज असणार नाही. तीन दिवसात सगळे रक्कम प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खात्यावर जमा होईल.त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. पीएफधारकाला KYC, दाव्याची विनंती, बँकेची सविस्तर माहिती द्यावी लागते.

पीएफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

  • सर्व प्रथम UAN आणि पासवर्ड वापरून EPFO च्या https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या पोर्टलवर लॉगिन करा. 
  • आता तुम्हाला ऑनलाइन सेवांवर जाऊन ‘क्लेम’ विभाग निवडावा लागेल. बँक खाते सत्यापित करा, ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा वर क्लिक करा. 
  • नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 निवडावा लागेल. 
  • आता तुम्हाला पीएफ खाते निवडावे लागेल.आता तुम्हाला पैसे काढण्याचे कारण, किती पैसे काढायचे आणि पत्ता भरावा लागेल. 
  • यानंतर चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!