Close Visit Mhshetkari

Reliance Scholarship: रिलायन्स फाउंडेशन देणार 5 हजार 100 विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख शिष्यवृत्ती; पहा पात्रता निकष अर्ज सविस्तर माहिती…

Reliance Scholarship : नमस्कार मित्रांनो,विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून रिलायन्स फाउंडेशनने 2024 – 25 सालासाठी तब्बल 5 हजार 100 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

भारतातील पदवी व पदवीधर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. संबंधित शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्र, पात्रता आणि निकष काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Reliance Scholarships Application Process

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयासाठी शिष्यवृत्ती देणार आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.विद्यार्थी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्ती निवडीची प्रक्रियेसाठी 12 चे मार्कशीट्स,ॲप्टिट्यूड टेस्ट रिझल्ट, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.

हे पण वाचा ~  HDFC Bank Scholarship : एचडीएफसी बँक 12 च्या विद्यार्थ्यांसाठी 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे ? लगेच करा अर्ज..

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप – अर्ज

रिलायन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. यासाठी आपल्याला रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी . या लिंकवर अर्ज करावा लागेल. याशिवाय कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

सदर स्कॉलरशिप संदर्भात अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या scholarships.reliancefoundation.org या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 6 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!