Salary Budget : दिनांक 22.10.2024 रोजीचे मा.संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात केले आहे की, दिनांक 23.10.2024 व 24.10.2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे,म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होईल.
State Employees Salary Budget Update
दिनांक 26.10.2024 ते 29.10.2024 या कालावधी दरम्यान कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे. करीता नमुद दिनांकादरम्यान कोणतेही देयक कोषागारात स्विकारले जाणार नाही. त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी अशी सूचना प्राप्त झाली आहे.
शासनाच्या अनेक विभागांसह ग्राम विकास व अन्य विभागांचे अनुदान वितरित झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या) जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगर पालिका) शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठीचे अनुदान शासनाकडून अद्यापही संचालनालयास उपलब्ध झालेले नाही.
शालार्थ वेतन प्रणाली अपडेट्स
शालार्थ प्रणालीतील देयके तयार असूनही वेतन अनुदान अनुलब्धतेमुळे BDS काढून कोषागार कार्यालयाकडे देयके सादर करता आलेली नाही.जिल्हा स्तरावर अनुदान उपलब्ध झाल्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन आणि कोणतीही तांत्रिक अडचण न आल्यास प्रत्यक्ष खात्यात वेतन जमा होण्यास कार्यालयीन कामकाजाचे किमान ८ दिवस लागतात असा सार्वत्रिक अनुभव आहे.
दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन होण्यासाठी लगेच वेतन अनुदान उपलब्ध होणे आणि सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केल्यासच शिक्षकांना दिवाळी पूर्वी वेतन प्राप्त होईल.
सदरील वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे वेतनासाठी अनुदान उपलब्धता, वितरण आणि अन्य आवश्यक प्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२४ पूर्वी होऊन प्रत्यक्ष वेतन दिवाळीपूर्वी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही अत्यंत शीघ्रतेने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.