School Holiday : उपसचिव,महाराष्ट्र शासन तुषार महाजन यांच्या कडून आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तर काय आहे बातमी आणि कोणाला मिळणार सुट्टी पाहूया सविस्तर…
Maharashra School Holiday
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. सदरील निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यापासून निवडणूक मोजणी निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्यातील शिक्षकांचा सहभाग असतो.अशावेळी निवडणूक प्रक्रिया दरम्यान शिक्षकांना व शाळांना शाळेच्या नियोजना संदर्भात मोठी अडचण निर्माण होत असते या संदर्भात आता शिक्षण आयुक्त व सचिवांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण आयुक्तांकडून निवडणूक ड्युटी संदर्भात शाळांना सुट्टी मिळावी यासाठी पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६/ निवडणूक सुटी / ६८३१, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४ विनंती करण्यात आली होती. आता यावर उपसचिव यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
Public Holidays for Assembly Election
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर,२०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी विनंती केली आहे.
आता या संदर्भात शिक्षण आयुक्तांकडून सुद्धा पत्र निर्गमित करण्यात आले असून शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदरील पदराने निर्णय घेण्याचा सूचना नुकत्याच प्राप्त झालेले आहेत.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की यापूर्वीच मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.