State Employee News : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा संग्राम आता संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
नुकतंच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3 टक्के वाढ मिळालेले आपण पाहिलेली आहे. यांचा मागे फक्त आता 50 टक्के वरून 53% करण्यात आलेला आहे.
State Employee Bonus News
मित्रांनो, खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणारे 29 हजार रुपयांचे बोनस आता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर ..
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की बऱ्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांना आचारसंहितेमुळे दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळू शकली नाही.बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसविना दिवाळीचा मोठा सण साजरा करावा लागला.
राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून, या कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल 29 हजार रुपये बोनस वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सदरील बोनसची रक्कम 26 नोव्हेंबर 2024 रोजी पात्र ठरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार बेस्टच्या एका अधिकाऱ्याने, आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाईल अशी माहिती दिली आहे.
पालिका प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा या अनुषंगाने ८० कोटी रुपयांची रक्कम बेस्टच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली होती.
परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदरील बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास अडथळा निर्माण झाला होता.
बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना सनग्रह अनुदान वाटप करता आले निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात विनंती करण्यात सुद्धा आली होती, परंतु सदरील रक्कम वर्ग होऊ शकली नव्हती. पण आता आचारसंहिता संपली असून या संबंधित बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता बोनसची रक्कम जमा होणार आहे.