State Employees : वित्त विभागातील अर्थसंकल्पिय कामकाजाशी संबंधित जसे की,अर्थसंकल्प कक्ष, अर्थसंकल्पीय भाषण कक्ष,साधनसंपत्ती कक्ष,कराधान कक्ष इत्यादी कक्षामधील अधिकारी/कर्मचारी यांना शासन निर्णयान्वये भत्ते मंजूर करण्यात आले आहेत.
State Employees Allowance Hike
वित्त विभागाच्या येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पातील कार्यक्रमावरील खर्चाचे समन्वयन नियोजन विभागाकडे सोपविण्यात आले आहे.नियोजन विभागातील अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना भत्ते मंजूर करण्यात आले आहेत.
वित्त विभागाने सदर मानधनाच्या अनुज्ञेय दरामध्ये शासन निर्णय, दिनांक २८.४.२०२३ अन्वये सुधारणा केली आहे. त्याच धर्तीवर नियोजन विभागातील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या जादा कामकाजासाठी देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
शासनाने याबाबत आता असा निर्णय घेतला आहे की, नियोजन विभागातील कार्यक्रम प्रभागातील (१) कार्यासन-१४११, १४१२ व १४१४ (२) कार्यासन-१४१६ (विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र ही विकास मंडळे अस्तित्वात नसल्याने,”विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशनिहाय” याबाबतचे प्रकाशन) (३) जिल्हा वार्षिक कार्यक्रमाशी संबंधित कार्यासन-१४८१ आणि (४) विकास क्षेत्र कार्यासने इत्यादी (५) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ (नियोजन) यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या जादा कामासाठी अनुज्ञेय मानधनाच्या दरात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
मानधनाचे सुधारित दर सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापासून अंमलात येतील.
ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती किमान ७५% असणे अनिवार्य आहे. जर उपस्थिती ५०% असेल तर त्यानुसार ५०% रक्कम अनुज्ञेय राहील.उपरोक्त रक्कम ठोक रक्कमेच्या स्वरुपात देण्यात येईल.
“सदर अधिकारी / कर्मचारी यांनी आपले काम समाधानकारकपणे पार पाडले आहे” अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी सह सचिव / उप सचिव यांच्या प्रमाणपत्राच्या अधिन राहून सदर भत्ते मंजूर केले जातील.
यांच्या गोपनीय भत्त्यात 2 % वाढ
शासकीय मध्यवर्ती,मुद्रणालय मुंबई येथील गोपनीय व लॉटरी विभागातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने गोपनीय भत्ता मंजूर करण्याबाबत दुसरा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासकीय मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथील केवळ गोपनीय व लॉटरी विभागातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतनाच्या २% इतक्या दराने गोपनीय भत्ता देण्यास मान्यता देण्यात येत आहे.