UPI Payment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की, आज कालच्या जमान्यात यूपीआय पेमेंट हे त्याची बाब झालेली आहे. सध्या भाजीपाल्यापासून मोठ-मोठ्या खरेदी पर्यंत फोन पे,गुगल पे , पेटीएम सारख्या एपीआय प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
एखाद्या वेळेस आपल्याकडून नजर चुकीने चुकीच्या क्रमांकावर ती पैसे सेंड होतात अशा वेळी मोठी पंचायत होते होते तर त्या परिस्थितीत आपला पैसा परत कसा मिळवायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
UPI Payment Mistake
जर आपण चुकून दुसऱ्या व्यक्तीला मोबाईल नंबर वरती किंवा बँकेत पैसे हस्तांतरित केलेले असेल आणि सदरील व्यक्ती आपल्या संपर्कातील असेल तर त्याच्याशी आपण थेट संपर्क करून त्याला विनंती करून आपले पैसे परत मिळू शकता. पैसे परत मिळत नसेल आणि मोठे रक्कम असेल तर आपण पोलिसात तक्रार करू शकता.
आपण जर अनावधानाने UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आपण पाठवलेली रक्कम ४८ ते ७२ तासांच्या आत परत मिळवू शकता. येथे नमूद केलेल्या युक्तीमध्ये, तुम्हाला कुठेही धावण्याची गरज नाही, आपण फक्त ऑनलाइन तक्रार सर्व पैसा परत मिळू शकतो.
UPI Payment System Update
टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा
- चुकीचे UPI पेमेंट होताच, सर्वप्रथम बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला कॉल करणे आवश्यक आहे.
- आपल्याला UPI सेवा प्रदात्याशी देखील संपर्क साधला येऊ शकतो.
- मित्रांनो आपल्याला 18001201740 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तक्रार करता येईल.
- ज्यामध्ये पेमेंटची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. RBI च्या नियमांनुसार, आपण आपल्या पेमेंट सेवा प्रदात्याला चुकीच्या पेमेंटबद्दल माहिती देऊन लवकर परतावा मिळवू शकता.
- आपल्याला GPay, PhonePe, Paytm किंवा UPI ॲपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून या प्रकरणाची माहिती द्यावी लागेल.
NPCI पोर्टलवर तक्रार
आता वरील ठिकाणी मदत न मिळाल्यास आपण NPCI पोर्टलवर तक्रार करू शकता.
- सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर Get in contact वर क्लिक करा. यानंतर विनंती केलेली सर्व माहिती प्रविष्ट करा.
- याठिकाणी आपले नाव, ईमेल आयडी अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे.
- सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, तक्रार विभागांतर्गत व्यवहार तपशील प्रविष्ट करा.
- ज्यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन आयडी, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, ट्रान्सफर केलेली रक्कम, ट्रान्झॅक्शनची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यांचा समावेश असेल.
- आता शेवटी कारण विचारले जाईल, तेथे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केलेले निवडून शेवटी फॉर्म सबमिट करा.