UPI Payment : नमस्कार मित्रांनो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने एक नवीन योजना आखली आहे. या अंतर्गत ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी अधिक सुरक्षा अधिक सुरक्षित केली जाईल. परंतु याचा मोठा फटका ऑनलाईन पेमेंट वापरणाऱ्यांना बसणार आहे. आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला चार अंकी किंवा सहा अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो परंतु आता यामध्ये बदल करण्यात येत आहे.
वास्तविक, NPCI काही स्टार्टअप्सशी बोलणी करत आहे, जेणेकरून PIN पासवर्डऐवजी बायोमेट्रिक प्रमाणीकरण UPI आधारित ऑनलाइन पेमेंटमध्ये आणले जाऊ शकते.
फेस स्कॅन आणि फिंगरप्रिंटद्वारे पेमेंट केले जाईल
तुम्हाला माहिती नसेल परंतु गेल्या आठवड्यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने देखील ओटीपी व कार्ड व्यवहारासाठी नवीन पर्याय शोधण्यासाठी बँकेला सांगण्यात आले आहे.
डिजिटल युगामध्ये कार्ड पेमेंट करण्याकरता मोबाईल ओटीपी हा अतिशय आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे परंतु यूपीआय पेमेंट साठी पिन पासवर्ड सुद्धा आवश्यक आहे नवीन बदलामुळे युजर फिंगर प्रिंट किंवा फेस स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकतील तुम्हाला माहिती असेल की आयफोन डिव्हाईस अनलॉक करण्यासाठी स्कॅन आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पेमेंट देखील फेस स्कॅन करू शकता
ऑनलाइन फसवणुकीविरोधात आरबीआय कठोर
पिन पासवर्ड मुळे अनेक ऑनलाईन फसवणूक होताना आपल्याला दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये रिझर्व बँकेला ऑनलाइन पेमेंटची चिंता वाढत असल्यामुळे आरबीआयने बँकांना इतर पर्याय शोधण्यास सांगितले आहे कारण पिन आधारित मोबाईल पेमेंट जवळपास तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्यामुळे अहवालानुसार NPCI द्वारे बायोमेट्रिक आधारित UPI पेमेंट येणाऱ्या तीन महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
पिन पासवर्डची समस्या काय आहे?
पिन पासवर्ड हा एक तुमच्यासाठी सुरक्षित पर्याय असणार आहे. परंतु त्याची समस्या असे आहे. की एकदा तुम्हाला तुमचा पिन पासवर्ड कळाल्यानंतर तो त्याच्या मदतीने तुमच्या फोनवरून पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर फेस स्कॅन व बायोमेट्रिक मध्ये हे होणार नाही यामुळेNPCI आणि RBI द्वि-घटक प्रमाणीकरणासाठी बायोमेट्रिक्स वापरण्यावर भर देत आहेत.
प्लॅटफॉर्म नामिबियामध्ये डिजिटल व्यवहार सुलभ करेल, आर्थिक समावेशन वाढवेल. आणि कमी सेवा नमिळालेल्या लोकसंख्येला पुरवून रोख अवलंबित्व कमी करेल. हा सहयोगात्मक प्रयत्न ग्रामीण आणि अनौपचारिक क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून सर्वांना आवश्यक आणि परवडणारी आर्थिक सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.